पणजी: फातोर्डा येथील रवींद्र भवनमध्ये आयोजित कॉटन फॅब प्रदर्शनाला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद लाभला असल्याची माहिती या प्रदर्शनाचे आयोजक जावेद खान यांनी दिली. हे प्रदर्शन 16 मे पर्यंत खुले राहणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. 15 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातील 100 विणकर सहभागी झाले आहेत. देशातील विविध प्रांतातील कॉटन, खादी व सिल्कची वस्त्रप्रावरणे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत. ती पाहण्यासाठी तेथे मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती लाभत आहे, असे खान यांनी सांगितले. सिल्क वस्त्रांची निर्मिती करणारे देशभरातील कारागिरही आपल्या उत्पादनांसह आले आहेत. त्यांच्या सिल्कवरील विणकामाला लोकांची पसंती लाभत असल्याचे ते म्हणाले. सकाळी 10.30 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन खुले असते.
या प्रदर्शनात बनारसमधील मरसराईज व सेमी सिल्क जामदानीचे कपडे, लखनौचे चिकनकारीचे कपडे, अलीगडमधील एप्लिक व पॅचवर्कचे कपडे, मध्य प्रदेशमधील वजनाने हलक्या चंदेरी, महेश्वरी साड्या, बिहारमधील कोसा कोरा व भागलपुरी सिल्क व कॉटन, राजस्थानमधील राजपुताना पारंपरीक ठप्पा छपाई आणि कोटा डोरिया व बंधेजचे कपडे, कच्छ व भुज येथील मनमोहक पारंपरीक छपाई, बंजारा कढाई तथा बंधानीचे कपडे, पटियाला सलवार यांचा समावेश या प्रदर्शनात आहे. प. बंगालमधील तांत व कांथ्, बालुचरी व बायलू, तनछुई जामदानीच्या साड्या, ओडिशाचे पारंपरीक सम्भलपूरी कपडे, कर्नाटक रॉ सिल्क तथा हुबळी, बेळगाव येथील साड्या, मदुराई, सेलम व कांजीवरम साड्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.