Mapusa Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Goa News: म्हापसा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांचा राजीनामा

Goa News: म्हापसा येथील नगरपालिका नगराध्यक्षांच्या पाठोपाठ, विराज फडके यांनीही उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

दैनिक गोमन्तक

Goa News: म्हापसा येथील नगरपालिका नगराध्यक्षांच्या पाठोपाठ, विराज फडके यांनीही उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. फडके यांनी बुधवारी (ता.२१) राजीनामा पालिका प्रशासन संचालनालयाकडे सुपूर्द केला. सत्ताधारी गटातील अलिखित सामंजस्य करारानुसार फडके हे या पदावरून पायउतार झाले.

यासंदर्भात उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी प्रतिक्रिया दिली की, ज्या दृष्टीने मी हा पदभार स्वीकारला होता, ती सगळे कामे मला करता आली नाहीत. त्याची मला खंत आहे. मात्र, माजी नगराध्यक्ष मिशाळ यांनीही चांगले काम केले. आमच्या कार्यकाळात वरील पदाला आम्ही प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न केला.

तसेच मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, म्हापसेकर व इतर सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

गेल्या ८ फेब्रुवारी रोजी तत्कालीन नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. १४ रोजी हे राजीनामापत्र नगरपालिका संचालनालयाने ग्राह्य धरला होता. शुक्रवारी २३ रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्षांची निवड होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT