Ponda Politics Dainik Gomantak
गोवा

Curti Khandepar: फोंड्यात राजकीय वातावरण ‘चार्ज’! कुर्टी-खांडेपार सरपंचाचा राजीनामा; उत्‍सुकता वाढली

Curti Khandepar Panchayat: फोंडा मतदारसंघातील एकमेव पंचायत कुर्टी-खांडेपारचे सरपंच हरीश नाईक यांनी राजीनामा दिल्यामुळे फोंड्याचे राजकारण नव्‍या दिशेने. नव्या सरपंचाचे पंचायतीला वेध लागले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: फोंडा मतदारसंघातील एकमेव पंचायत कुर्टी-खांडेपारचे सरपंच हरीश नाईक यांनी राजीनामा दिल्यामुळे या मतदारसंघाचे राजकीय वातावरण ‘चार्ज’ होऊ लागले आहे. नव्या सरपंचाचे पंचायतीला वेध लागले आहेत. नाईक हे या पंचायतीचे तिसरे सरपंच. आता चौथे सरपंच कोण, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

अलिखित करारानुसार, हरीश नाईक यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी अभिजीत गावडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सध्या या पंचायतीत भाजपचे ६, डॉ. केतन भाटीकर गटाचे ३ व काँग्रेस व अपक्ष १ असे बलाबल आहे. त्यामुळे परत भाजपचा सरपंच होणार हे जवळजवळ निश्चित आहे.

ठरल्याप्रमाणे गावडे यांचा नंबर असला तरी फोंडा नगरपालिकप्रमाणे ऐनवेळी काहीही होऊ शकते असे बोलले जात आहे. नगरपालिकेत नगरसेवक वीरेंद्र ढवळीकर यांचा नंबर असतानासुद्धा लॉट काढून आनंद नाईक यांची वर्णी लावण्यात आली होती. तसे ऐनवेळी इथेही घडू शकते असे बोलले जात आहे.

नगरपालिकेप्रमाणे पंचायतीतही भाजपचे दोन गट असून पंच अभिजीत गावडे हे फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी गटाचे मानले जातात. २०२५च्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणुका होणार असल्यामुळे सध्या कुर्टी-खांडेपार पंचायतीला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाजपमधील दोन्ही गटांना आपला सरपंच असावा असे वाटणे साहजिकच आहे. कृषीमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांची पहिली पसंती त्यांचे निकटचे कार्यकर्ते मनीष नाईक यांना असली तरी त्यांचा नंबर गावडे यांच्‍यानंतर असल्याचे कळते. आता यामुळे रवी कोणती चाल खेळतात ते पहावे लागेल. हे पाहता गावडेंची निवड ही सर्वस्वी रवींच्या मर्जीवर अवलंबून असणार एवढे निश्चित.

या राजकीय घडामोडींत काँग्रेसच्या विल्मा परेरा व आत्तापर्यंत कुंपणावर बसून या पंचायतीतील बदल पाहणारे माजी सरपंच तथा विद्यमान पंच भिका केरकर हे कोणती भूमिका घेतात हेही बघावे लागेल. पण तरीही त्यांच्या भूमिकेमुळे या पंचायतीतल्या राजकारणात विशेष बदल होऊ शकेल असे सध्या तरी वाटत नाही. एकंदरीत सरपंचाच्या राजीनाम्यामुळे परत एकदा कुर्टी-खांडेपार पंचायत व फोंडा मतदारसंघाच्या राजकारणाची दिशा बदलण्याचे संकेत मिळायला लागले आहेत एवढे निश्चित.

पुन्‍हा एकदा संगीत खुर्चीचा खेळ?

गेल्या खेपेला कुर्टी-खांडेपार पंचायतीचे सरपंचपद आठ पंचानी भूषविले होते. यावेळी केवळ दोन वर्षांत चौथ्या सरपंचचाचे आगमन होत असल्यामुळे गेल्या वेळेचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता अधिक वाटत आहे. पण या संगीत खुर्चीमुळे पंचायतीच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. प्रस्तुत पंचायत ही केवळ फोंडा मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील एक महत्त्वाची पंचायत असल्यामुळे या पंचायतीचे सरपंचपद भूषविणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. आणि त्यामुळेच हे पद मिळवण्यासाठी अशी स्पर्धा लागलेली बघायला मिळत आहे.

नव्या सरपंचाची निवड १५ रोजी

कुर्टी-खांडेपारच्या पंचायतीच्‍या नव्या सरपंचांची निवड मंगळवारी १५ ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. त्याच दिवशी वारे कोणत्या बाजूने वाहणार, हे कळू शकेल. सध्‍या तरी तर्कवितर्क लढविण्‍यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT