Water supply dainik gomantak
गोवा

पाण्‍यासाठी हणजूणवासीय आक्रमक; कार्यालयावर धडक

पाण्‍याची समस्या दोन दिवसांत सुटली नाही तर हणजूवासीयांचा मोर्चाचा इशारा

दैनिक गोमन्तक

म्हापसा : गेल्या वर्षभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने हणजूणमधील नागरिक त्रासलेले आहेत. त्यामुळे हणजूणमधील नागरिक आक्रमक झाले असून त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या म्हापसा येथील कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच त्यांनी साहाय्यक अभियंत्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. (Hanjunavasi aggressive for water)

तसेच अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन सादर करून सरकारचा निषेधही करण्‍यात आला. साहाय्यक अभियंता तनय कांदोळकर व दीपक बोरकर यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत देण्‍यात आली. तसेच पाण्याचा हा प्रश्न मार्गी लावला नाही तर येत्या गुरुवारी सर्व हणजूवासीयांना बोलवून या ठिकाणी मोठे आंदोलन (Movement) करू, असा इशाराही त्यांनी दिला.

डिमेलोवाडा-हणजूण (Dimelovada-Hanjun) येथील श्री रामपुरुष राष्ट्रोळी ब्राह्मण देवस्थानच्या वतीने हणजुणवासीयांनी सादर केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सुमारे एक वर्षापासून आम्हाला अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासंदर्भातील आमच्या मूलभूत हक्कापासून आम्ही वंचित आहोत. साध्यासुध्या घरगुती वापरासाठीही पाणी मिळणे अशक्य झाले आहे. पाण्याची बिले (Bills) वेळच्या वेळी भरूनही सरकारकडून (Government) हा अन्याय आमच्यावर होत आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी (Villagers) सांगितले, की ही समस्या या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमोर यापूर्वी कित्येकदा मांडलेली आहे. असे असतानाही पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही व उपाययोजना हाती घेतलेली नाही. त्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण केले जात असले तरी त्यांची ती उत्तरे मुळीच समाधानकारक नाहीत. ते केवळ सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

उल्हास गडेकर, रोहन नाईक, ज्योती म्हापसेकर यांनी सांगितले की खासगी टँकरचे पाणी विकत घेणे आम्हाला परवडत नाही व टँकर (Tanker) आणला तरी ते पाणी साठवून ठेवण्यासाठी आमच्याकडे मोठी भांडी नाहीत. त्यामुळे आमची मोठी गैरसोय होत आहे.

पर्यवेक्षकावर कारवाई करण्याची मागणी

हणजूण भागात पाणीपुरवठा (Water supply) करण्याची जबाबदारी असलेला लाईनचा पर्यवेक्षक लोकांचा फोनही घेत नाही आणि कोणताच प्रतिसादही देत नाही. हा कर्मचारी (Staff) सर्वच बाबतीत बेजबाबदारपणा दाखवत असल्याने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी यावेळी साहाय्यक अभियंत्यांसमोर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जलस्रोतांच्‍या सुरक्षेसाठीही कोर्टानेच पुढाकार घ्यायचा?- संपादकीय

Rashid Khan: 'मी अफगाणिस्तानसाठीच खेळणार!', राशिद खाननं नाकारलं भारताचं नागरिकत्व; आयपीएलच्या रणधुमाळीत मोठा खुलासा

डिचोलीत 'मानकुराद'ची चव किंचित झाली 'गोड', दर आवाक्यात; मानकुराद 1000 ते 1200 तर हापूस 500 रुपये डझन

शिरगावात 'मॉक ड्रिल' यशस्वी; मात्र नियोजनात मोठी विसंगती, दीड हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग; जेवणाची व्यवस्था नसल्याने उपासमारीची वेळ

Jammu and Kashmir Bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उधमपूरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; 10 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT