Goa Electricity Department: वारंवार वीज गायब होत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान
Power Outage Canava
गोवा

Agonda News: खंडित विजेमुळे आगोंदवासी हैराण

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद येथे गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. काल ३० जून रोजीचा टी-२० विश्‍वचषक स्पर्धेतील अंतिम क्रिकेट सामनाही लोकांना पाहता आला नाही. याविषयी संबंधितांशी संपर्क साधला असता, एक तर फोन बंद असतो किंवा उचलला जात नाही.

सुदैवाने फोन उचलल्यास वीज फॉल्ट मिळत नाही, प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले जाते. आगोंद व खोला भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी माजी सरपंच प्रमोद फळदेसाई यांनी केली आहे.

वारंवार वीज गायब होत असल्यामुळे सर्वांचेच हाल होत आहेत. विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होते. गृहिणींना स्वयंपाक बनविताना नाकीनऊ येत आहेत. घरातील महागडी विद्युत उपकरणे खराब होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

मे महिन्यात वीज‌पुरवठा बंद करून वीजवाहिन्या व अन्य यंत्रणांची दुरुस्ती वीज खात्याने केली होती, तर मग हे सर्व करून नागरिकांना काय फायदा झाला, असा प्रश्न माजी सरपंच फळदेसाई यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

River Rafting Goa: गोव्यात वॉटर राफ्टिंग सुरु, पर्यटकांना अनुभवता येणार थरार; सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार उपक्रम

PWD अधिकारी काम सोडून गाणे ऐकण्यात मग्न, काँग्रेसचा आरोप; सरकारी इमारतींच्या सेफ्टी ऑडिटची पाटकरांची मागणी

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना आता बायोमेट्रिक हजेरी सक्तीची!

Goa Today's News Live: म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या वतीने गांजे नदीची पाहणी...

तेरेखोल, शापोरा, मांडवी, झुआरीत 5 दशलक्ष घनमीटर रेती; रेतीसाठा काढण्यासाठी परवाने देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT