Wild animals entering houses in Sattari
वाळपई: आतापर्यंत रानटी प्राण्यांकडून शेती-बागायतीमधील उत्पादित मालाची नासाडी करण्याचे प्रकार घडत होते. आता त्या पलीकडे जाऊन माकड, खेती हे वन्यप्राणी चक्क घरात घुसून स्वयंपाकघरातील अन्नधान्य, भाजीपाला यावर डल्ला मारत असल्याचे प्रकार सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहेत.
सत्तरी तालुक्यात सध्या जंगली श्वापदे, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी, बागायतदार हवालदिल झाले आहेत. यासाठी सरकारची उदासीनता कारणीभूत ठरत आहे. अनेकदा ही रानटी प्राणी बळीराजाच्या जीवावरही उठली आहेत. अशा कठीण परिस्थितीमुळे बागायतदारांचे शेतीतील अर्थकारण, व्यवस्थापन बिघडले असून यासाठी कोणती उपाययोजना करावी, या विवंचनेत ते आहेत.
सत्तरी तालुका कृषीसंपदेने नटलेला असून भविष्यात ही कृषी संस्कृती टिकणार काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जंगलातील अन्न-पाण्याचे स्रोत नष्ट झाल्याने वन्य प्राण्यांनी लोकवस्तीकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे सरकारी सबसिडी घेऊन काय फायद्याची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सध्या सत्तरी तालुक्यातील विविध गावांमध्ये गव्यांसह रानडुक्कर, खेती यांचा मुक्त संचार दिसून येतो. गवे बागायतीत, रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. त्यामुळे लोकांना बागायतीत जाणे धोक्याचे बनले आहे. गवे तर आता घराच्या अंगणातदेखील येऊन फिरत आहेत. वन खात्याने लोकांना संरक्षण देण्याकडे दुर्लक्ष केल्याने लोकांचे जगणे खडतर झाले आहे.
घरात कडधान्य, तांदुळ वगैरे धान्ये खरेदी करून आणलेली असतात. त्या पिशव्याच फाडून त्यातील धान्य फस्त केले जात आहे. घरातील मंडळी कामानिमित्त परसबागेत, अंगणात असताना घराच्या मागील दारातून दबक्या पावलाने जाऊन ते अन्नधान्याची नासाडी करतात. लोकांना आता अंगणात देखील काहीच अन्नधान्य वाळविण्यासाठी ठेवता येत नाही. घराच्या छपरावर उड्या मारून कौले, पत्रे यांचे नुकसान केले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.