
188 people arrested in Goa for drug cases 2024
पणजी: २०२४ साली ड्रग्स तस्करी तसेच सेवनप्रकरणी गोवा पोलिसांनी १८८ जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये १११ बिगर गोमंतकीय, २३ विदेशी तर ५४ गोमंतकीय आहे. उत्तर गोवा पोलिसांनी यावर्षी ६७ ड्रग्जची प्रकरणे नोंद करून ७७ जणांना अटक केली व १.४० कोटीचा ६२.९११ किलो ड्रग्ज जप्त केला.
अटक केलेल्यांत १६ गोमंतकीय, ५४ बिगर गोमंतकीय व ७ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. दक्षिण गोवा पोलिसांनी ३९ प्रकरणे नोंद केली व ५० जणांना अटक केली. ७४.७६ लाखांचा ६८.३४४ किलो ड्रग्ज जप्त केला. अटक केलेल्या ५० पैकी २५ गोमंतकीय, २३ बिगर गोमंतकीय व २ विदेशी नागरिक आहेत.
एएनसीने २७ प्रकरणे नोंद केली व ३२ जणांना अटक केली त्यामध्ये ७ गोमंतकीय, १५ बिगर गोमंतकीय व १० विदेशी नागरिक आहेत. त्यांच्याकडून ६.८५ कोटीचा ९२८.३८ ड्रग्ज जप्त केला. क्राईम ब्रँचने २३ प्रकरणे नोंद केली व २६ जणांना अटक केली त्यात ६ गोमंतकीय, १६ बिगर गोमंतकीय व ४ विदेशी नागरिक असून ६५.७१ लाखांचा ३५.३७६ ड्रग्ज जप्त केला.
कोकण रेल्वे पोलिस स्थानकाने ३ प्रकरणे नोंदवून ३ बिगर गोमंतकीय अटक केली व त्यांच्याकडून १५.४५ लाखांचा १५.४६२ किलो ड्रग्ज जप्त केला. गेल्यावर्षी पोलिसांनी ८.३८ कोटींचा २०४ किलो ड्रग्ज जप्त केला होता व १९७ जणांना अटक केली होती.
राज्यात २९ डिसेंबर २०२४ पर्यंत भादंसंखाली २०९६ गुन्हे नोंद झाले त्यापैकी १८४४ (८७.९८ टक्के) प्रकरणांचा छडा लावण्यात आला. ऑक्टोबर २०१४ पर्यंत २५० प्रकरणांमध्ये संशयिताला दोषी धरण्यात आले आहे. राज्यात नोंद झालेल्या खुनाची २९ प्रकरणे, खुनाचा प्रयत्न केल्याची २९ प्रकरणे तसेच बलात्कारापैकी १०६ पैकी १०० प्रकरणे, दरोड्याच्या ३ तर जबरी चोऱ्यांच्या १३ प्रकरणांचा छडा लागला आहे. या एकूण १८० गुन्ह्यांपैकी १७४ प्रकरणांचा तपास लागून आरोपपत्रे दाखल केली आहेत.
सायबर क्राईम विभागाने ५६ गुन्हे दाखल केले त्यापैकी १८ प्रकरणांचा तपास लावण्यात यश आले व ४५ जणांना अटक करण्यात आली. सायबर गुन्ह्यांमधून लोकांची फसवणूक केलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाली आहे. फसवणूक होणाऱ्या रकमेचे प्रमाण ९ कोटी प्रती माह वरून ६ कोटी प्रती माह असे झाले आहे. पोलिस खात्याच्या विविध हेल्पलाईनवर मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल्स आले त्यापैकी ६०,८३२ कॉल्स पोलिस नियंत्रण कक्षाच्या गस्तीवरील पोलिसांनी उपस्थिती लावून मदत केली तर पिंक फोर्स पोलिसांनी ५५९५ कॉल्सच्या ठिकाणी जाऊन पीडिताला मदत केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.