GCZMA Dainik Gomantak
गोवा

‘जीसीझेडएमए’ अधिकाऱ्यांना हाकलले

खारीवाडावासीय आक्रमक: ‘कोळसा हब’साठी उद्योगपतींशी संगनमताचा आरोप

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव बंदर प्राधिकरण आणि गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी खारीवाडा येथे घरांची संयुक्त पाहणी (सर्वे) करण्यासाठी आले असता येथील रहिवाशांनी त्यांना हाकलून लावले. मुरगाव बंदर प्राधिकरण आणि गोवा सरकार कोळसा साठवण्यासाठी खारीवाडा येथील घरे उद्ध्वस्त करण्यासाठी उद्योगपती अदानींशी संगनमत केल्याचा आरोप यावेळी येथील रहिवाशांनी केला.

मुरगाव पालिकेच्या अधिकाऱ्यांनी 16 मार्च 2022 रोजी पोलिस फौजफाटा घेऊन खारीवाडा येथील 18 घरांच्या अनधिकृत बांधकामाचा विस्तारित भाग पाडला होता. मुरगाव पोर्ट ट्रस्टने खारीवाडा येथील बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

नंतर 363 इतर बेकायदेशीर बांधकाम पैकी सुमारे 18 कुटुंबांनी त्यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रासह न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, मुरगाव नगरपालिकेने सर्वेक्षण योजनेचा भाग नसल्याने खारीवाडा येथील 18 पैकी 12 घरांचा अनधिकृत भाग जमीनदोस्त केला होता. यावेळी राजकीय नेत्यांसह संतप्त रहिवाशांनी नंतर मुरगाव पालिकेवर मोर्चा काढला आणि ती घरे पाडण्याबाबत खुलासा मागितला. पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले.

दरम्यान, आज दुपारी 11 च्या दरम्यान बंदर प्राधिकरण आणि किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी संयुक्त पाहणीसाठी आले असता येथील रहिवाशी भांबावून गेले. खारीवाडाच्या रहिवाशांना विश्वासात न घेता हे सर्वेक्षण चालले होते. त्या अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना जाब विचारला असता ते निरुत्तर झाले आणि त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून तेथून हुसकावून लावले. यावेळी तिथे काँग्रेसचे नेते विरीयतो फर्नांडिस रहिवाशांच्या मदतीला धावून आले व त्यांनी त्या अधिकाऱ्यांनाकडून खुलासा मागितला असता त्यांना ते उत्तर देऊ शकले नाही. रहिवाशांचे आक्रमक रूप पाहून त्या अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT