सासष्टी: संरक्षण मंत्रालय व डायरेक्टोरेट ऑफ एनसीसी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकासाठी साळ नदीतील पाणी नेणार आहे. परंतु वेर्णा येथून ४० किलोमीटरचा प्रवास करून मोबोर येथे अरबी समुद्रात पावन होणारी ही नदी पूर्ण प्रदूषित झालेली असल्याने हे दूषित पाणी दिल्लीस नेण्यास अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
प्रदूषित साळ नदीचे पाणी राष्ट्रीय उपक्रमांसाठी वापरणे म्हणजे तो एक फार्सच आहे असे लोकांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय हरित लवादाने राज्य सरकारला नदीचा प्रदूषित भाग आंघोळी पुरता तरी स्वच्छ करण्याचा आदेश दिला आहे.
समाजसेवक दिनेश काकोडकर यांनी सांगितले की, हे दूषित पाणी दिल्लीला नेणे हा सासष्टीतील लोकांचा अपमान आहे. एरवी या नदीचे पाणी किती दुषित आहे हे दिल्लीकरांना कळणार नाही, परंतु चांगल्या कार्यासाठी दुषित पाणी वापरणे योग्य नाही. पर्यावरण मंत्री, जलस्त्रोत मंत्री तसेच नावेलीच्या आमदारने साळ नदीच्या पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
समाजसेवक रॉक फर्नांडिस यांनी सांगितले की, पूर्वी आम्ही या नदीत मासे मारायचो, मागे काही वैमानिकांनी येऊन येथील स्थितीची पाहणी केली व लगेच त्यानी या पाण्यात ऑक्सिजनचा स्तर कमी असून हे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदुषित असल्याचे तेव्हाच जाहीर करुन टाकले होते.
अभिजित प्रभुदेसाई यांनी सांगितले की, सरकार पर्यावरणीय प्रश्न हाताळण्यास अपयशी ठरले आहे व साळ नदीचे प्रदूषण हा त्याचे उत्तम उदाहरण आहे.
एन्थनी डिसिल्वा यांनी सांगितले की, येथील पाणी दिल्लीत नेणे ही चांगली गोष्ट असली तरी पाण्याची स्थितीचा अंदाज घेणे सुद्धा महत्वाचे आहे. केंद्र सरकारच्या नद्यांचे राष्ट्रीयकरण करण्याच्या निर्णयामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत, त्यामुळे कुणालाच या प्रदूषणच संदर्भात योग्य निर्णय घेता येत नाही, असे त्याने सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.