ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: 'विधानसभेसाठी ‘एसटी’ना जागा आरक्षित करा'

2027 निवडणुकीत अनुसूचित जमाती समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करणारे निवेदन घेऊन आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही खासदारांना भेटणार आहोत, अशी माहिती उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

ST Reservation: देशातील अनुसूचित जमातीच्या आरक्षणासंदर्भात संसदीय समिती गठित केली होती. समितीने आपला अहवाल काल सादर केला असून त्यांचे अभिनंदन करता. 2002पासून आरक्षणावरून आम्ही आंदोलन करत आहोत. 2007 ते 2022 अशा चार निवडणुकांमध्ये आरक्षण दिले नाही.

परंतु 2027 निवडणुकीत अनुसूचित जमाती समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करणारे निवेदन घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि दोन्ही खासदारांना भेटणार आहोत, अशी माहिती उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली.

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजस्थान येथील आदिवासी नेता राकेश मिना आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

अनुसूचित जमातीला विविध क्षेत्रात आरक्षण मिळालेले नाही. यात पंचायत, जिल्हा पंचायत, विधानसभा आणि प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये बढती यांचा समावेश आहे. निदान आता संसदीय समितीने आपला अहवाल सादर केला आहे.

परंतु गोवा सरकारने देखील राज्यात आरक्षण लागू होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात येणार आहे. धारगळ येथे आरक्षणासंदर्भात महामेळावा आयोजित केला जाईल,असेही वेळिप म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT