Buffelo Rescue Dainik Gomantak
गोवा

आठवडाभर कालव्यात अडकलेल्या म्हशींची सुखरुप सुटका

डिचोलीतील घटना, मालकानेच म्हशींना कालव्यातून बाहेर काढलं

दैनिक गोमन्तक

डिचोली : जवळपास आठवडाभर डिचोली भागात कालव्यात अडकलेल्या म्हशींची अखेर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सोमवारी संबंधित मालकानेच म्हशींना कालव्यातून सुखरुप बाहेर काढले. मात्र गेले आठ दिवस म्हशी कालव्यात अडकल्याने मालकही चिंतेत होता. आपल्या म्हशी कालव्यात अडकल्याची माहितीच नसल्याने मालकाने म्हशींचा बराच शोध घेतला. अखेर एका तरुणाच्या मदतीने म्हशींची सुटका करण्यात मालकाला यश आलं.

डिचोलीतील (Bicholim) व्हाळशी भागातून गेलेल्या आणि सध्या कोरडा असलेल्या कालव्यात दोन म्हशी गेल्या आठवडाभरापासून अडकून पडल्या होत्या. त्या बाहेर येण्यासाठी धडपडत होत्या. हा प्रकार व्हाळशी येथील एका युवकाने पाहिला आणि त्याने या कालव्यात (Canal) अडकलेल्या म्हशींच्या मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मालकही म्हशींच्या शोधात होता मात्र कालव्यात अडकल्याने म्हशी मालकाला दिसल्या नव्हत्या.

मालकाचा शोध घेत असताना युवकाला या म्हशी (Buffelo) लाखेरे-डिचोली येथील संदीप ताटे यांच्या असल्याचे समजले. म्हशी कालव्यात अडकल्याची माहिती मिळताच सोमवारी सकाळी म्हशीच्या मालकाने कालव्याच्या ठिकाणी धाव घेतली आणि म्हशी कालव्याबाहेर काढल्या. मात्र म्हशींची सुटका होईपर्यंत म्हशी व्हाळशीहून बऱ्याच दूर पोचल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT