Republican Party Supports Congress For Goa Assembly Election Dainik Gomantak
गोवा

Goa Election: गोवा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा

भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक व्यासपीठावरून काम केले पाहिजे: गिरीश चोडणकर

Vilas Mahadik

पणजी: विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीने काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. आनंद सुर्वे, प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर आदी यावेळी उपस्थित होते. (Republican Party supports Congress for goa assembly election)

चोडणकर म्हणाले की, एआयआरपीचे मांद्रे, पेडणे, थिवी आणि हळदोण मतदारसंघात सक्रिय सदस्य आहेत. "त्यांचे इतर मतदारसंघातही समर्थक आहेत, जे काँग्रेसला जागा जिंकण्यास मदत करतील." असे चोडणकर म्हणाले.

गिरीश चोडणकर (Girish Chodankar) म्हणाले की, भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक व्यासपीठावरून काम केले पाहिजे. “भाजपच्या राजवटीत लोकांना त्रास सहन करावा लागला म्हणून त्यांना घरी पाठवणे आवश्यक आहे. गोव्याच्या चांगल्या भविष्यासाठी भाजपला पराभूत करणे आवश्यक आहे.’’ असे चोडणकर म्हणाले.

भाजपचा (Goa BJP) पराभव करण्यासाठी ते काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे ज्ञानेश्वर म्हणाले. “काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि या पक्षाने नेहमीच गोव्यातील लोकांसाठी काम केले आहे. भाजपच्या राजवटीत जनता त्रस्त आहे. त्यामुळे भाजपला घरी पाठवण्याची गरज आहे.’’ असे ते म्हणाले.

बाबासाहेब आंबेडकर भवन गोव्यात प्रत्यक्षात आले पाहिजे, यासाठी त्यांनी काँग्रेसकडे मागणी केली असल्याचे ते म्हणाले.

राव म्हणाले की, एआयआरपी सर्व मतदारसंघात काँग्रेससोबत (Goa Congress) काम करेल. “त्यांचा आवाज ऐकला जाईल आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करून त्या पूर्ण केल्या जातील. आम्ही समाजातील सर्व घटकांची काळजी घेऊ.” असे राव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SUV खरेदीदारांसाठी खुशखबर! केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महिंद्रा, टाटा आणि टोयोटाच्या गाड्या तब्बल 3.5 लाखांनी स्वस्त

Sanguem Lottery Winner: गणपती बाप्पा पावला...! सांगे गणेश मंडळाच्या लॉटरीत होमगार्ड महिलेला जॅकपॉट; 2 BHK फ्लॅटसह 35 लाखांची लागली लॉटरी

Asia Cup 2025: सर्वांच्या नजरा सूर्या-बुमराहकडे, पण 'हे' 3 खेळाडूच ठरू शकतात खरे 'गेम चेंजर'; भविष्यवाणी ठरणार का खरी?

PWD मंत्री दिगंबर कामत Action Mode मध्ये, बायणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास अचानक दिली भेट

मित्राच्या बर्थडे पार्टीवरुन परत येताना काळाने गाठले; फाईव्ह स्टार हॉटेलच्या फ्रंट ऑफिसरचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT