Goa Republic Day: कुठ्ठाळी बायणा, भूते भाट क्रीडा मैदानावर ध्वजारोहण करताना उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस देसाई. Dainik Gomantak
गोवा

Goa Republic Day: 'आपण देशासाठी काय केले याचा विचार करा'

वास्कोत प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमात उपजिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य

दैनिक गोमन्तक

वास्को: आजच्या दिवशी संविधानाचे लोकार्पण झाले. म्हणून आज आम्ही हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करतो. संविधानात मी हा शब्द नाही, आम्ही हा शब्द लोकांनी लोकांसाठी केलेला लोकांचा आहे. तसेच आम्हाला देशाने काय दिले हे विचारात आणण्यापेक्षा आम्ही देशासाठी काय केले हा विचार मनात आणायला पाहिजे, असे प्रतिपादन मुरगाव तालुक्याचे उपजिल्हाधिकारी श्री दत्तराज गावस देसाई यांनी केले.(Republic Day in Goa passed with enthusiasm)

Goa Republic Day

उपजिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी मुरगाव वास्को, गोवा क्रिडा प्राधिकरण भूते भाट मैदान येथे आयोजित केलेल्या 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त Republic Day ते बोलत होते. भूते भाट क्रीडांगणावर आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात यावेळी मामलेदार रघुनाथ देसाई, संयुक्त मामलेदार जेनिफर फर्नांडिस फर्नांडिस, रंजीत साळगांवकर, उपधीक्षक सलीम शेख, निलेश राणे, वेर्णा पोलीस निरीक्षक डायगोग्रासियस, पोलिस उपअधिक्षक सुदेश नार्वेकर, अग्निशामक दलाचे फ्रान्सिस्को मेंडिस, सवास्को पोलीस निरीक्षक नितीन हळणकर, उदय गावडे दितेंद्र नाईक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, विन्सन डिसोझा तसेच उपजिल्हाधिकारी मामलेदार रवींद्र भवन कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण Flag Hoisting केल्यानंतर वास्को Vasco पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी गावस देसाई म्हणाले की प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय अभिमान देशभक्ती आणि उत्कटता दर्शवणारा दिवस आहे. आपल्या देशाचे महान नेते आणि स्वातंत्र्यसैनिक कशासाठी लढले याचा विचार करून या दिवशी भारताच्या खऱ्या वीरांचे स्मरण करूया. ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्यामुळे आपण आमच्या देशाबद्दल भावना प्रदर्शित करू शकतो असे ते शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT