MLA Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

धार्मिक सलोखा बिघडवणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवा

हळदोण्याचे आमदार फरेरा यांची मागणी

दैनिक गोमन्तक

एका विशिष्ट धर्माविरुद्ध वादग्रस्त विधाने करून धार्मिक सलोखा बिघडवणार्‍यांविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदवावी, अशी मागणी हळदोण्याचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे आमदार कार्लुस आल्वारेस फरेरा यांनी केंद्र सरकारला केली आहे.

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा तसेच दिल्ली आयटी सेलचे प्रमुख नवीन जिंदल शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्‍वभूमीवर फरेरा यांनी ही मागणी केली आहे. नुपूर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून जिंदल यांना निलंबित करण्यात आले होते.

‘भारतीय संविधानाच्या आधारे सर्व धर्मांचा आदर करत असल्याचे भाजपने सिद्ध केले पाहिजे. कतारमधील भारतीय दूतावासानेदेखील केंद्र सरकारकडे एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. भाजपच्या नेत्यांद्वारे केलेल्या वक्तव्यांचे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटले आहेत’ असे फरेरा म्हणाले.

या वादग्रस्त वक्तव्याबाबत विदेशातून कडव्या प्रतिक्रिया येत असतानाच आश्‍चर्यकारकरित्या केंद्र सरकारने मौन बाळगणे पसंत केले असून भाजपने प्रतिक्रिया देत सुटला आहे, असे फरेरा म्हणाले.

काही राजकीय नेते नियमितपणे वक्तव्ये करून देशातील वातावरण गढूळ बनवत आहेत. सरकारदेखील यावर तोडगा काढत नसल्याने त्यांच्यावरील अविश्‍वास वाढत आहे. लोकांनी वक्तव्ये केल्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्यास त्यांना सरकारचा पाठिंबा असल्याचे किंवा सरकारच्या निर्देषावरून ते करत असल्याचे दिसते. यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. हे तातडीने थांबले पाहिजे. हे लोक राष्ट्र विरोधी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

SCROLL FOR NEXT