Yuri Alemao Slams BJP Government Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: पुलाच्या उद्‍घाटन खर्चापेक्षा मडगाव बसस्थानक दुरुस्त करा

Yuri Alemao: शेड जीर्ण झाल्याने प्रवाशांना धोका

दैनिक गोमन्तक

Yuri Alemao: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 22 डिसेंबर रोजी नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्‍घाटन करणार आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु यावेळेला भाजप सरकारने पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनावेळी केलेला 2 कोटींचा खर्च टाळून त्या निधीचा वापर मडगाव बसस्थानकाच्या दुरुस्तीसाठी करावा,

अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. मागील विधानसभेच्या अधिवेशनात मला दिलेल्या उत्तरावरून नवीन झुआरी पुलाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्‍घाटन कार्यक्रमावर सरकारने 2 कोटी रुपये खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे.

बेजबाबदार भाजप सरकारने करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी केल्याचे उघड झाले आहे. राज्यावरील एकूण कर्जाचे ओझे 35 हजार कोटींवर पोचलेले असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खर्च कपातीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.

मडगाव बस स्टँड हे संपूर्ण दक्षिण गोव्याचे प्रवेशद्वार आहे. या बसस्थानकाचा शासनाच्या महसुलात वाटा आहे. या बसस्थानकातून गेल्या 4 वर्षांत शासनाला 1.93 कोटींचा नफा झाला आहे.

दुर्दैवाने तेथील बसशेडची देखभाल करण्यासही भाजप सरकार अपयशी ठरले आहे. बसस्थानकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची गरज आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: केळी, कवाथ्यांची नासधूस! सुपाऱ्यांच्या झाडांचेही नुकसान; ओंकार हत्तीमुळे शेतकरी हैराण Watch Video

Goa Nightclub Fire: हडफडे दुर्घटनेबाबत वेगळेच कनेक्शन समोर! युवकाचा झाला होता बुडून मृत्यू; भुताटकी असल्याचा काहींचा दावा

Video: उद्धवस्त छत, जळून खाक झालेलं साहित्य; 25 जणांचा बळी घेणाऱ्या गोव्यातील नाईटक्लबचा व्हिडिओ समोर Watch

Goa Politics: खरी कुजबुज; मग राजकारण्‍यांवर कारवाई का नाही?

Karapur: '..हा अपघात नसून, खुनाचाच प्रकार'! शेकडो नागरिकांची पोलीस स्थानकावर धडक; मशाल मोर्चातून चौकशीची मागणी Video

SCROLL FOR NEXT