Rent Bank Accounts Scam In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात फसवणुकीचा नवा फंडा! बँक खाती 'Rent' वर घेऊन तरुणांना गंडा, अवघ्या 1 हजारांचं कमिशन भोवलं

Rent Bank Accounts Scam In Goa: शिवोली येथील एका व्यक्तीची ऑनलाइन ट्रेडिंग प्रकरणात 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता.

Pramod Yadav

'रेंट अ बाईक' हा प्रकार गोमंतकीयांसाठी काही नवा नाही. पण, राज्यात सध्या 'रेंट अ बँक अकाऊंट' असा एक स्कॅम सुरु झालाय असं जर तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल?

हो! गोव्यात बेरोजगार तरुणांची बँक खाती भाड्याने घेऊन लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबदल्यात तरुणांना कमिशन देखील दिले जात असल्याचे गोवा पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

सायबर गुन्हेगार बेरोजगार तरुणांकडून बँक खाती भाड्याने घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याचे गोवा पोलिसांनी म्हटले आहे.

गुन्हेगार या तरुणांना प्रत्येक एक लाख रुपयांच्या व्यवहारासाठी एक हजार रुपये कमिशन देतात. अलिकडेच एका 21 वर्षीय तरुणाचे खाते भाड्याने घेत त्याला या जाळ्यात अडकवले. अनेक बेरोजगार तरुण अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी बँक खाती भाड्याने देत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

गुन्हेगार ओळखीच्या व्यक्तींमार्फत तरुणांशी संपर्क साधतात आणि त्यांना पैशाचे आमिष दाखवून बँक खाती भाड्याने घेतात. फसवणूक करणारे प्रत्येक एक लाख रुपयांच्या व्यवहारासाठी खाते भाड्याने देणाऱ्याला एक हजार रुपये कमिशन देतात. काही प्रकारांत चेकबुकवरील माहितीच्या आधारे अशा तरुणांना संपर्क साधला जातो, असे सायबर क्राईम विभागाचे पीआय दीपक पेडणेकर म्हणाले.

फसवणुकीतून मिळालेले पैसे संबधित खातेदाराच्या खात्यावर जमा केले जातात. तरुणाला त्याचे कमिशन देऊन उरलेले पैसे काढून घेतले जातात.

अलिकडेच शिवोली येथील एका व्यक्तीची ऑनलाइन ट्रेडिंग प्रकरणात 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली. 20 ते 25 वर्षे वयोगटातील अनेक तरुण त्यांची बँक खाती भाड्याने देत ​​असल्याचे तपासात समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT