Anjuna Car Accident Dainik Gomantak
गोवा

Anjuna Car Accident: हणजुणेत पर्यटकांची कार 'आऊट ऑफ कंट्रोल'! ओडिशाचे 3 जण गंभीर जखमी; मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याचा आरोप

Anjuna Car Accident Today: ओडिशा येथील पर्यटकांनी भरलेली ही कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटली.

Manish Jadhav

Goa Tourist Car Crash News: हणजुणे येथे एका रेंटने घेतलेल्या कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली. ओडिशा येथील पर्यटकांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटली. या अपघातात तीन पर्यटक जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हणजुणे येथील अरुंद रस्त्यांवर वेगाने गाडी चालवणे या पर्यटकांच्या जीवावर बेतले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ओडिशाहून गोव्यात (Goa) पर्यटनासाठी आलेल्या तरुणांचा एक गट भाड्याने घेतलेली कार घेऊन हणजुणे परिसरातून जात होता. अचानक एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याशेजारील नाल्यात जाऊन कोसळली. कार नाल्यात उलटल्याने मोठा आवाज झाला, ज्यामुळे परिसरातील नागरिक आणि इतर पर्यटकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. "गाडीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता आणि चालक गाडीवर नियंत्रण ठेवू शकला नाही," असे काही स्थानिकांनी सांगितले. अपघातानंतर परिसरात एकच तोबा गर्दी झाली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून कार नाल्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली आहे.

गोव्यात रेंटने कार घेऊन पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मद्यपान करुन गाडी चालवणे आणि रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करणे यामुळे गोव्यातील रस्ते असुरक्षित होत असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात आहेत. हणजुणे (Anjuna) पोलीस सध्या या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून चालकाची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तो खरोखरच नशेत होता का, हे स्पष्ट होईल. या अपघातामुळे हणजुणे परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT