Chodan Panchayat News Dainik Gomantak
गोवा

Chodan News: चोडण येथे ५० लाख खर्चून दोन स्मशानभूमींचे नूतनीकरण; आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते उद्‍घाटन

Chodan Madel Panchayat: सुमारे ५० लाख रुपये खर्च करून चोडण पंचायत क्षेत्रातील दोन स्मशानभूमींचे नूतनीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्यातून देवगी आणि मुड्डी येथील स्मशानभूमीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: सुमारे ५० लाख रुपये खर्च करून चोडण पंचायत क्षेत्रातील दोन स्मशानभूमींचे नूतनीकरण करण्यात आले आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहकार्यातून देवगी आणि मुड्डी येथील स्मशानभूमीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते या विकसित कामाचे उद्‍घाटन करण्यात आले.

यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर, सरपंच रवींद्र किनळकर, अन्य पंचसदस्य तसेच माजी सरपंच कमलाकांत वाडयेकर, नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर आदी उपस्थित होते.

पार्थिवांवर सुरळीतपणे अंत्यसंस्कार व्हावेत, अशी मृत व्यक्तीच्या कुटुंबांची इच्छा असते. त्यासाठी स्मशानभूमीत आवश्‍यक सर्व सोयी असणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ग्रामीण विकासमंत्री गोविंद गावडे यांच्या सहकार्यामुळे चोडण येथील स्मशानभूमींचा विकास करता आला, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT