sanguem constituency Dainik gomantak
गोवा

सांगेत संभ्रम दूर, 'या' दोन्ही नेत्यांनी भाजपच्या...

गैरसमजामुळे दूर गेलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा फळदेसाई यांच्या बरोबर प्रचार करतांना दिसू लागले आहेत

दैनिक गोमन्तक

केपे : भाजपाच्या सांगेतील उमेदवारीच्या यादीतून सावित्री कवळेकर यांचे नाव काढण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यामध्ये सुरू असलेली संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे. सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) आणि सुभाष फळदेसाई या दोन्ही नेत्यांनी भाजपाच्या उमेदवारिवर दावा केला होता. त्यामुळे नेमके कोणत्या बाजूने जावे अशी स्थिती भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांची झाली होती. पक्षाने फळदेसाई यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमधील गोंधळ संपुष्टात आला असून सर्व जण फळदेसाईं यांच्यासाठी प्रचार करतांना दिसत आहेत. आपल्याकडून काही चूक झाल्यास माफ करावे. आणि पुन्हा भाजप (BJP) सत्तेत येण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन सुभाष फळदेसाई यांनी केले आहे.

माजी आमदार (MLA) सुभाष फळदेसाई आणी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यां पत्नी सावित्री कवळेकर यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार चढाओढ लागली होती.सावित्री कवळेकर यांनी आपले वजन वाढवण्यासाठी सांगेच्या भाजाप मंडळातील माजी अध्यक्ष नवानाथ नाईक आणि अन्य काही कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने ओढले होते. भाजप मंडळात फुटाफूटीचे वातावरण निर्माण होऊन बराच गोंधळ मजला होता. त्यात कवळेकर यांनी आपल्याला उमेदवारी जाईल असा प्रचार केल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

पक्षाने फळदेसाई यांना उमेदवारी दिल्यानंतर कार्यकर्त्या मधील संभ्रम दूर झालेला आहे. गैरसमजामुळे दूर गेलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा फळदेसाई यांच्या बरोबर प्रचार करतांना दिसू लागले आहेत. उमेदवारी जाहीर केल्यानंतर फळदेसाई यांनी सांगे शहराचा भाग असलेला बेंडवाडा, मुस्लीमवाडा तसेच उगे, भाटी, रिवण आणि नेत्रावळी पंचायत क्षेत्रात प्रचाराची फेरी पूर्ण केली आहे. आमदार नसतानाही आम्ही सांगेत भाजपची दोन कार्यालये उघडली आणी लोकांना सेवा दिली. आज ते सर्व लोक आपल्याबरोबर उभे आहेत. आपल्याकडून नकळतपणे घडलेल्या चुकांमुळे कोणाला त्रास झाला असेल तर आपण क्षमा मागतो. दूर गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांनी भूल चूक माफ करून पुन्हा एकत्र यावेत असे कळकळीचे आव्हान फळदेसाई यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT