विकास कामाच्या नावाने केंद्र व राज्य सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. मोठे प्रकल्प राबवून स्थानिक शिक्षीत युवकांना बाजूला करून केंद्र व राज्य सरकारने फक्त स्वतःचा विकास केला असल्याची माहिती वास्को मतदार संघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार ॲड. सुनील लोरेन यांनी दिली. राज्य भाजपने संपूर्ण गोव्यातील जनतेला आर्थिकरित्या कुंमकुवत करून ठेवले असल्याचा गंभीर आरोप ॲड. लोरेन यांनी केला. आप गोव्यात नवीन संजीवनी निर्माण करण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) अवश्य इतिहास घडविणार असल्याची प्रक्रिया ॲड. सुनील लोरेन यांनी दिली.
वास्को मतदार संघात आम आदमी पक्षाचे (AAP) युवा उमेदवार ॲड. सुनील लोरेन यांनी रविवार वास्को चे ग्रामदेव दामोदर यांचे दर्शन घेऊन प्रचार कार्याला सुरुवात केली. श्री दामोदर मंदिरातील पुरोहित भूषण जोशी यांनी सामूहिक गार्हाणे घातले. यावेळी आपचे उमेदवार सुनील लोरेन यांच्या मातोश्री, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना ॲड लोरेन म्हणाले की केंद्र सरकारने विकास कामाच्या नावाने फक्त सर्व मोठ्या प्रकल्पात भ्रष्टाचार माजविला आहे. तसेच मोठ मोठ्या प्रकल्पात स्थानिक शिक्षित युवकांना सामावून न घेता एका प्रकारे युवकावर अन्याय केला आहे.
भाजपचे (BJP) एकच उद्दिष्ट स्वतःचा विकास कसा साधायचा, म्हणूनच गोव्यात बेरोजगारी वाढली असल्याची माहिती ॲड. सुनील लोरेन यांनी दिली. गोव्यातील शिक्षित युवकांना येथे नोकऱ्या उपलब्ध होत नसल्याने ते विदेशात नोकरी व्यवसाय करण्यासाठी जात असल्याची माहिती त्यांनी दिली. गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष अवश्य इतिहास घडविणार असल्याचा विश्वास ॲड. लॉरेन यांनी व्यक्त केला.
आम आदमी पक्षाची नीती म्हणजे सामान्य जनतेला न्याय, शिक्षण, आरोग्य व वाढत्या महागाईवर योग्य प्रकारे नियंत्रण. यासाठी आपले प्रत्येक मतदारसंघात कोविड-19 महामारी वेळी गरजूंना कडधान्य मोफत वितरीत केले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे नेतृत्व गोव्यात अवश्य बदल घडणार असल्याची माहिती ॲड. सुनील लोरेन यांनी दिली. गोवा आपचे मुख्य निमंत्रक राहुल म्हांबरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मतदार संघात आपचे कार्यकर्ते एक संघाने कार्य करीत असून जनतेकडून पक्षाला बऱ्यापैकी सहकार्य लाभत असल्याची माहिती ॲड. सुनील लोरेन यांनी दिली. दरम्यान वास्को चे आपचे उमेदवार ॲड. सुनील लोरेन यांनी वास्को सेंट अँड्रू चर्च व ओल्ड क्रॉस चे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.