Dona Paula jetty dainikgomantak
गोवा

दोना पावला जेट्टीवरील पार्किंगला अडथळा ठरणारी झाडं हटवा

दोना पावला जेट्टीवरील पार्किंगला अडथळा ठरणारी झाडं हटविण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

दैनिक गोमन्तक

पणजी: दोना पावला जेट्टीवरील पार्किंगच्या ठिकाणी अडथळा आणणारी झाड (tree) हटवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने हे निर्देश पणजी (Panaji) शहराच्या महामंडळाला (CCP) दिले आहेत. तसेच न्यायालयाने CCP ला " ती झाडं योग्य ठिकाणी लावण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे पार्किंग येथील प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणी कोणताही अडथळा होणार नाही याची खात्री होईल. (remove a tree blocking the entry and exit at a parking lot at the Dona Paula jetty says Bombay high court)

CCP ला हे निर्देश न्यायमूर्ती मनीष पितळे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा (Justices Manish Pitale and R N Laddha) यांच्या खंडपीठाने दिले आहेत. जेट्टीवर पार्किंगसाठी योग्य जागा देण्यात यावी, असे निर्देश ही न्यायालयाने (court) दिले आहेत. दोना पावला जेट्टीवरील (Dona Paula jetty) पार्किंगच्या संदर्भात रहिवाशांनी 2019 मध्ये न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. ज्यामध्ये त्यांनी अधिग्रहित केलेल्या जमिनीवर तात्काळ पार्किंग आणि शौचालयाची सुविधा निर्माण करावी आणि सरकारला (state government) इतर कारणांसाठी जमीन वापरण्यापासून परावृत्त करावे अशी मागणी न्यायलयाकडे केली होती

यासंदर्भात परिसरातील रहिवाशांचे प्रतिनिधीत्व करणारे वकील अमेय काकोडकर यांनी, पार्किंगच्या जागेच्या प्रवेशद्वारावर एका झाडाचे रोपण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेश आणि बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे छायाचित्रे न्यायालयात सादर केली होती.

दोना पावला या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ पोलिस अधीक्षक (वाहतूक) हे वाहतुक व्यवस्थित करण्यासाठी योग्य उपाय करतील. तसेच तेथे वाहतूक कोंडी होणार नाही याचीही काळजी घेतील. याची खात्री असल्याचे उच्च न्यायालयाने आधीच्या आदेशात म्हटले होते. तर सरकारने उच्च न्यायालयाला (high court) ऑक्टोबरमध्ये आश्वासन दिले की, ते दोना पावला जेट्टीला (Dona Paula jetty) भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा एका महिन्यात उपलब्ध करून देईल.

अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी कोर्टाला सांगितले होते की, चार आठवड्यांत सर्व अडथळे दूर करून पार्किंगच्या सुविधेतील प्रवेश आणि बाहेर जाणे सुलभ केले जाईल. त्यावर स्थानिक रहिवाशांनी पार्किंगची सोय नसल्याचा दावा उच्च न्यायालयात केला. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, राज्य सरकारने (state government) सांगितले की 90% पार्किंगची सुविधा तयार आहे आणि फक्त गेट्स निश्चित करायचे आहेत.

पार्किंगसाठी अधिग्रहित केलेली जमीन सरकारला वापरण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले असतानाही, पर्यटकांना (tourists) दोना पावला जेट्टीवर (Dona Paula jetty)घेऊन जाणारी वाहने जेट्टीच्या मार्गावर रस्त्याच्या कडेला उभी राहतात, ज्यामुळे परिसरात अराजकता आणि गोंधळ निर्माण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट जगतात खळबळ! ड्रग्जच्या व्यसनामुळं दिग्गज क्रिकेटपटूची कारकीर्द उद्ध्वस्त, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची 'एक्झिटट

Chhattisgarh Train Accident: छत्तीसगढमध्ये मोठा रेल्वे अपघात! लोकल ट्रेनची मालगाडीला जोरदार धडक,10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी; प्रवाशांची धावपळ VIDEO

Vaibhav Suryavanshi Record: 9 चौकार, 4 षटकार... 'टेस्ट'मध्ये 'टी-20' सारखा धमाका, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं पुन्हा इतिहास रचला

Pirna Murder Case: पीर्ण खून प्रकरणी कोलवाळ पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींनी केले आत्मसमर्पण; लवकरच होणार मोठा उलगडा?

VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT