काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी भाजप विरोधी सोडलं मौन

काँग्रेस कोणत्याही भाजपविरोधी पक्षाशी युती करण्यास तयार आहे;काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव
काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव
काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव Dainik Gomantak

गोवा: राज्यातील काँग्रेस आणि भाजप वाद सध्या शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस कोणत्याही भाजपविरोधी पक्षाशी युती करण्यास तयार आहे; टीएमसी आणि आपचेही स्वागत आहे पण ते त्यांच्या नेत्यांवर अवलंबून आहे; आम्ही एमजीपीचे देखील स्वागत करतो; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारचा भाग व्हावे अशी आमची इच्छा आहे. असे वक्तव्य काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषदेत केले. तसेच उद्या काँग्रेस उमेदवारांची बैठक होणार आहे. (Congress in-charge Dinesh Gundu Rao statment against BJP)

काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव
Goa Weather Updates: राज्यात अवकाळी पावसाचे सावट

दरम्यान काही दिवसांपुर्वी चोडणकरांनी पत्रकार परिषदेत, "भाजप सरकारवर (Goa BJP) राज्य आर्थिक गैरव्यवस्थापनाचा आरोप करत त्यांनी गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस (Goa Congress) हा बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आम्हाला गरज पडल्यास आम्ही भाजप विरुद्ध लढलेल्या सर्व पक्षांना आमच्या सरकारात स्थान देऊ असे म्हणत चोडणकरांनी भाजपला सडकून उत्तर दिले होते."

आम्ही गोवेकरांना जिंकण्यासाठी ही निवडणूक लढवली आहे.

दरम्यान ते म्हणाले, "आम्ही गोवेकरांना जिंकण्यासाठी ही निवडणूक लढवली आहे, इतर पक्षांप्रमाणे केवळ निवडणुक जिंकण्यासाठी नाही या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत गोव्याचे नागरिक हा आमचा केंद्रबिंदू होता काँग्रेसने वेळोवेळी घेतलेल्या ठाम निर्णयामुळेच नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे.

नागरिकांची मते विचारात घेऊनच आम्ही पुन्हा नव्याने कॉंग्रेसची स्थापन केली. गोवेकरांना या निवडणुकीत आम्ही नवीन उमेदवार दिले गोवेकरांना जो बदल हवा होता, तो बदल विचारात घेऊन आम्ही जाहीरनामा तयार केला आहे. ते पुढे म्हणाले, भाजप आमच्यावरती पाळत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही भाजपला उघड पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आम्हाला टॅपिंग करण्याची गरज नाही आम्हाला विचारा आम्ही तोंडावर उघड पणे सांगू असे खुले आव्हान त्यांनी (Girish Chodankar) केले आहे. "

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com