पणजी (Panjim): चिंचोळे श्री क्षेत्र पिंपळेश्वर दत्त मंदिरात साप्ताहिक उत्सवानिमित्त (Festival) पहाटे 6 वा. काकडारती, दुग्धाभिषेक व धार्मिक (Religious) विधी. सायंकाळी 7. 30 वा. ‘शब्दसुरांचे लेणे’ हा साहित्य, काव्यसंगीतमय कार्यक्रम.
ताळगाव :ओयतीयांव येथील ओम शिव मंदिराचा 19 वा वर्धापनदिनानिमित्त सकाळी 6 ते 10.30 पर्यंत स्वहस्ते अभिषेक, प्रार्थना, श्रीगणेश पूजा आदी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायं. 7.30 मनोरंजनाचा कार्यक्रम.
पेडणे : चांदेल येथील देवी सातेरी पंचायतन देवस्थानच्या जत्रोत्सवानिमित्त सकाळी अभिषेक पूजा, धार्मिक विधी, रात्रो मामा मोचेमाडकर मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग.
हरमल : ग्रामदेवता रवळनाथ भूमिका पंचायतनाच्या जत्रोत्सवानिमित्त स. धार्मिक विधी, अभिषेक, आरती, तीर्थप्रसाद, रात्री पालखी मिरवणूक, पावणी व वालावलकर दशावतारी मंडळाचा नाट्यप्रयोग.
कुडचडे : बाल मारुती देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार तथा नूतन मूर्तिप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक विधी.
म्हापसा : खोर्ली येथील श्री देवी सातेरी संस्थानच्या कालोत्सवानिमित्त सकाळी विविध धार्मिक विधी, रात्री 10 वा. श्रींची मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा. नंतर टाळ मृदंगाच्या गजरात कालोत्सवाला सुरवात.
आजचे कार्यक्रम
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.