Goa Temperature | Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Temperature Falling in Goa: दिलासा! गोव्यात कमाल तापमानात झाली एक अंश सेल्सियसने घट

आगामी तीन दिवसात हलक्या पावसाची शक्यता

गोमंतक ऑनलाईन टीम

Temperature Falling in Goa: गोव्याच्या कमाल तापमानात बुधवारी एक अंश सेल्सियसने घट झाली. त्यामुळे कडक उन्हाळ्यात गोवेकरांना थोडा दिलासा मिळाला. गोव्याची राजधानी पणजीत तापमान 33.6 आणि मुरगाव येथे 33.2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते.

दरम्यान, येत्या काही दिवसांत गोव्यात काही ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) आधीच्या अंदाजात तापमानात वाढ होईल, असे म्हटले होते. कमाल तापमान 35 अंश सेल्सियस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सियस राहिल, असे गोवा वेधशाळेने म्हटले होते.

बुधवारी राज्यात कोरडे हवामान होते आणि काही ठिकाणी सकाळी धुकेही पडले होते. दरम्यान, गुरुवारी काही ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह हवामानात किंचित बदल होऊ शकतो, असे वेधशाळेने म्हटले आहे.

शुक्रवार, शनिवार आणि रविवारी काही ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात मोठा बदल अपेक्षित नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT