Goa Coastal Area Management Plan Dainik Gomantak
गोवा

Goa: जनसुनावणीपुरती संचारबंदी शिथिल

गोव्यातील (Goa) लोकांनी मोठ्या प्रमाणात येऊन आपले प्रश्न मांडावे यासाठीही सध्या काही गावात बैठका आयोजित केल्या जात आहेत.

दैनिक गोमन्तक

मडगाव : कोविड काळात (Covid-19) किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (Coastal Area Management Plan) सुनावणी घेण्यास जिल्हा प्रशासनावर निर्बंध आणून ही सुनावणी स्थगित करावी, या एनजीओंच्या (NGO) मागणीची स्वेच्छा दखल घेण्यास मुंबई उच्च (HC) न्यायालयाने स्वारस्य न दाखविल्याने आता शेवटचा उपाय म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे या एनजीओंनी पुन्हा स्थगितीसाठी साकडे घातले आहे. (Relaxation of curfew in Goa during public hearing)

सासष्टीतील एनजीओ जिना परेरा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून 8 जुलै रोजी होणारी जनसुनावणी स्थगित ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती. या पत्राची न्यायालयाने स्वेच्छा दखल घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली होती.

लोकांच्‍या जीवाशी खेळू नये : परेरा

आमची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही. आता रिट याचिका दाखल केली, तरी ती 8 रोजीच सुनावणीस येण्याची शक्यता असल्याने आम्ही तो विचार सोडून दिला आहे. मात्र, ही जनसुनावणी घेऊन सरकारने लोकांच्या जीवाशी खेळू नये, अशा आशयाची पत्रे आम्ही मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पाठविली आहेत, अशी माहिती परेरा यांनी दिली.

जनसुनावणी होणारच : कटयाल

8 रोजी दक्षिण गोव्यातील सुनावणी मडगावात एसजीपीडीए मार्केटसमोरील पार्किंग लॉटमध्ये होणार असून तीन हजार लोकांना सामावून घेऊ शकेल, असे दोन मोठे मंडप बांधण्याचे काम चालू होते. या सुनावणीला कदाचित राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती मिळणार, अशी या ‘एनजीओं’ना आशा होती. पण, तिथेही काही झाले नाही. आम्हाला कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याने ही सुनावणी ठरल्याप्रमाणेच होईल, अशी माहिती दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी रुचिका कटयाल यांनी दिली.

संचारबंदी जनसुनावणीपुरती शिथिल

8 रोजी ही सुनावणीस्‍थळी कुणाचाही व्यत्यय येऊ नये, यासाठी बैठकस्थळावरील संचारबंदी त्या दिवसांपुरती शिथिल करण्यात आली आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली. एकाबाजूने ही सुनावणी रद्द करावी, यासाठी ‘एनजीओ’ प्रयत्न करत असून दुसऱ्या बाजूने ही सुनावणी झालीच, तर त्यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात येऊन आपल्या हरकती मांडाव्यात यासाठीही सध्या येथे काही गावात बैठका आयोजित केल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT