CM Pramod Sawant Dainik Gomantak | Goa News Update |Corona Update
गोवा

गोव्यात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय लवकरच : मुख्यमंत्री

कोरोनाविषयक कृती दलाच्या शिफारसीवर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण खूपच कमी झाल्याने कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीने सर्व व्यवहार शंभर टक्के सुरू करण्याची शिफारस केली आहे. यावर निर्णय घेण्यासाठी कृती दलाची बैठक होण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे 3 मार्चला सर्व व्यवहार शंभर टक्के सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. (Goa CM Pramod Sawant News Updates)

तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार कोरोना नियंत्रणात असल्याने चित्रपटगृहे, कसिनो, स्पा, जलतरण तलाव तसेच आयएसएल गेम्स यासाठी 100 टक्के उपस्थितीला परवानगी देणे शक्य आहे. तज्ज्ञ समितीच्या बैठकीनंतर कृती दलाची बैठक झाली नाही. कोरोनाचा धोका नसल्याने या दलाच्या बैठकीशिवाय तज्ज्ञ समितीच्या शिफारशींवर निर्णय घेणे शक्य असल्यास तो घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोना (Covid 19) लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या शंभर टक्क्यांवर गेली आहे. नव्याने रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण घटले आहे. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण खूपच खाली आले आहे. त्यामुळे राज्यातले सर्व व्यवहार शंभर टक्के क्षमतेने सुरू करावेत, असे तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे. शाळा, (School) जीम, स्वीमिंग पूल, स्पा, थिएटर्स शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यास अडचण नसल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT