Christmas Festival 2022 | Christmas Festival Goa | CM Pramod Sawant | MLA Venzy Viegas Dainik Gomantak
गोवा

Christmas Festival Goa : नाताळ आणि नाताळच्या पूर्वसंध्येला आवाजाचे नियम शिथील करा - आमदार विएगस

सरकारने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेत बदल करण्याची आमदार विएगस यांची मागणी

Pramod Yadav

Christmas Festival : धार्मिक कार्यक्रमांसाठी मध्यरात्रीची संगीत मर्यादा शिथील करा अशी मागणी बाणावलीचे आमदार वेन्झी विएगस (MLA Venzy Viegas) यांनी केली आहे. याबाबत आमदार विएगस यांनी गुरूवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांना पत्र लिहले आहे. सरकारने मर्यादीत आवाजासाठीचे नियम नाताळच्या काळात शिथील करावेत असे आमदार विएगस यांनी पत्रात म्हटले आहे.

आमदार विएगस यांनी सरकारने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेत बदल करण्याची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावत यांच्याकडे केली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी चर्चमध्ये आयोजित धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील हीच तरतूद केली जावी. असे विएगस यांनी पत्रात म्हटले आहे. सरकारने गोव्याच्या परंपरेचा आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्य सरकारच्या नवीन अधिसूचनेनुसार, वर्षातील विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाच्या दिवशी रात्री 10 आणि मध्यरात्रीच्या संगीत आणि सार्वजनिक कार्यक्रमातील मोठ्या आवाजावर बंदी घालण्यात आली आहे. गोव्यात अनेक चर्च आणि कॅथोलिक संस्था पारंपारिकपद्धतीने नाताळच्या पूर्वसंध्येला (Christmas Eve and Christmas Day) मध्यरात्री धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात. दरम्यान, आवाजावर सरकारने बंदी घातल्याने या सेवांवर अनिश्चिततेचे ढग आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT