Konkani Literature Festival
Konkani Literature Festival Dainik Gomantak
गोवा

Konkani Literature Festival : 22 व्या कोकणी युवा साहित्य संमेलनाचे रेहमान अब्बास उद्घाटक

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव बार्देस येथे होणाऱ्या 22 व्या कोकणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे नामांकित उर्दु आणि इंग्रजी भाषेतील साहित्यीक रेहमान अब्बास यांच्या हस्ते होणार असून यावेळी गोवा विद्यापीठात कोकणी अध्यापन करणारे युवा साहित्यिक नरेश नाईक यांचा 'युवा साहित्यिक' पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

दोन दिवसांच्या या संमेलनाचे आयोजन गोवा कोकणी अकादमी आणि डीएमसी महाविद्यालय आसगाव यांनी केले असून 17 मार्च रोजी त्याचे उद्घाटन केले जाणार आहे. या संमेलन स्थळाला दिवंगत ज्येष्ठ कोकणी कवी नागेश करमली यांचे नाव देण्यात आले आहे.

रेहमान अब्बास हे रत्नागिरी येथे जन्म घेतलेले साहित्यीक असून त्यांच्या 'रोहझिन' या उर्दू कादंबरीला 2018चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. या पुस्तकाचे जर्मन, इंग्लिश आणि हिंदी भाषेत अनुवाद झाला आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी मार्कुस गोन्साल्विस यांची निवड करण्यात आली असून डीएमसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप आरोलकर हे स्वागताध्यक्ष तर प्रा. पुरुषोत्तम वेर्लेकर हे कार्याध्यक्ष आहेत.

या संमेलन स्थळाच्या मुख्य मंडपाला दिवंगत कोकणी कार्यकर्ते नारायण मावजो यांचे नाव दिले असून अन्य दालनाना स्व. एडवर्ड डीलिमा, स्व. प्रकाश पाडगावकर, स्व. जयमाला दणायत, स्व. रजनी भेंब्रे आणि स्व. रेवणसिद्ध नाईक यांची नावे देण्यात आली आहेत. या संमेलनात ज्येष्ट साहित्यीक दत्ता दामोदर नायक आणि नूतन साखरदांडे यांची नरेश नाईक हे मुलाखत घेणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Abduction Case: राजस्थानच्या व्यक्तीचे माडेल, थिवीतून अपहरण; जीवे मारण्याची धमकी देत लुटमार

Goa Crime News: पर्वरीत आयपीएलवर बेटिंग, गुजरात, युपीच्या 16 जणांना अटक; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Israel Hamas War: इस्त्रायली लष्करानं ओलांडली क्रूरतेची सीमा; अमेरिका म्हणाला, ''युद्धापूर्वीही IDFने दाखवली बर्बरता''

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळी विमानतळ; अखेर ‘बॉम्‍ब’ची ती अफवाच

Chhattisgarh Naxalites Encounter: सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरुच!

SCROLL FOR NEXT