Nilkanth Halarnkar | Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

Stray Cattles: प्रत्येक तालुक्यात 'गोशाळा' हवी! भटक्या गुरांच्या समस्येवरुन लोबो यांचे मत

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : राज्यात भटक्या गुरांची संख्या वाढत चालली असून त्यांचे पुनर्वसन होणे गरज आहे. त्यासाठी गोशाळांना आवश्‍यक सहकार्य करण्यास सरकार आग्रही आहे. तरीही ही समस्या सोडविण्यासाठी पंचायती तसेच सामाजिक संस्थांचा सहभाग आवश्यक आहे, असे मत पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी व्यक्त केले.

गोमंतक गौसेवक महासंघाच्या हळदणवाडी, मये येथील पाटेश्वर गोशाळेत गुरांसाठी बांधण्यात आलेल्या नवीन शेडच्या उद्‍घाटन सोहळ्यात मंत्री हळर्णकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

यावेळी खास पाहुणे या नात्याने कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते. तसेच सरपंच सीमा आरोंदेकर, पंचसदस्य कृष्णा चोडणकर, गौसेवक महासंघाचे अध्यक्ष कमलाकांत तारी, रुपेश ठाणेकर आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नवीन शेडचे उद्‍घाटन करण्यात आले.

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी गोमंतक गौसेवक महासंघाच्या कार्याचा गौरव करताना गोशाळेला आवश्‍यक सहकार्य करणार असल्याचे सांगितले. कमलाकांत तारी यांनी स्वागत केले. उद्‍घाटन सोहळ्यानंतर मान्यवरांनी गोशाळेतील व्यवस्थेची पाहणी केली.

प्रत्येक तालुक्यात गोशाळा हवी; लोबो

राज्यात भटक्या गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात गोशाळा उभारणे आवश्यक आहे. तरच रस्त्यांवरील भटक्या गुरांची समस्या नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे, असे मत आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले. राज्यात किमान १५ हजारच्या आसपास भटकी गुरे असावीत, असा अंदाज लोबो यांनी व्यक्त केला. प्रेमेंद्र शेट यांचेही यावेळी भाषण झाले. गोसेवा हे सत्कार्य असल्याचे त्यांनी सांगून, गोमंतक गौसेवक महासंघाच्या कार्याचे कौतुक केले. अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival Goa: अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देणारे उत्सव आमच्या इथे नकोच; दक्षिण गोव्यातले नेत्यांचा निर्धार

Baga Crime: गोव्यात पर्यटकांचा धुडगूस! स्थानिकांना मारहाण; संतप्त जमावाचा पोलिसांना घेराव

गोव्यात येऊन 'काहीही' करून चालणार नाही! पर्यटकांनी निसर्ग पाहावा, संस्कृती समजून घ्यावी; संपादकीय

Goa History: पुरातन काळातील मुंडारींचा वारसा सांगणारी 'गावडा संस्कृती'

Goa Travel Guide: गोव्यात आल्यावर प्रवासासाठी पर्याय काय? पर्यटकांनो जाणून घ्या

SCROLL FOR NEXT