राज्यातील नवीन भाजप सरकारमध्ये त्यांचे आमदार आलेक्स लॉरेन्स रेजिनॉल्ड यांना मंत्रिपद नाकारल्याबद्दल कुडतरी मतदारसंघातील अनेक समर्थक आणि कार्यकत्यांनी शनिवारी निराशा व्यक्त केली.
अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले, आलेक्स रेजिनॉल्ड (Aleixo Reginaldo) यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मात्र, चार वेळा आमदार राहिलेल्या आलेक्स लॉरेन्स रेजिनॉल्ड यांना मंत्रिपदासाठी डावलण्यात आल्याने मतदारसंघात भाजप विरोधी नाराजी पहायला मिळत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी अखेर पार पडला. भाजपचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई आणि मगोचे मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांना राज्यपाल (Governor) पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता राजभवनवर नव्याने उभारलेल्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. आता मंत्रिपदे मिळाली असली तरी खाती कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. खातेवाटपासाठी विलंब होणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिले आहेत.
28 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात केवळ भाजपच्या (BJP) 8 मंत्र्यांना मंत्रिपदे देण्यात आली होती. तर, रिक्त 3 जागांपैकी 2 जागांवर भाजपने आपल्या आमदारांची वर्णी लावली असून केवळ एक मंत्रिपद मित्रपक्ष असलेल्या मगोला दिले आहे. मंत्रिमंडळाचा कोटा आता पूर्ण झाल असला तरी प्रतीक्षा खातेवाटपाची आहे. यासाठी आणखी काही दिवस जातील, असे समजते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.