Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa News : गोमंतकीयांच्या रोजगाराबाबत श्वेतपत्रिका सादर करा : सरदेसाई

Goa News : परराज्यांतील युवक गोव्यात नोकरीसाठी येऊन स्थायिक होऊ लागले तर राज्याच्या लोकसंख्येवर परिणाम होणार असून भविष्यात ते त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. गोव्यात बेरोजगारीची टक्केवारी वाढत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

सासष्टी, गोव्यात ज्या औद्योगिक कंपन्या आहेत, त्या रोजगारासाठीच्या मुलाखती गोमंतकीय युवकांना डावलून इतर राज्यांमध्ये घेतात.

आम्ही इंडोको कंपनीची मुलाखत प्रक्रिया बंद पाडल्यानंतर आता मडकईस्थित ‘इनक्युब इथिकल्स’ कंपनीने नोकर भरतीसाठी मुलाखतीचा कार्यक्रम पुण्यात निश्र्चित केला आहे, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मात्र, सरदेसाईंच्या आक्रमकतेनंतर ‘इनक्युब इथिकल्स’ कंपनीने मुलाखतीचा कार्यक्रम रद्द केला.

सरदेसाई म्हणाले की, राज्य सरकारकडे गोमंतकीय युवकांना खासगी कंपन्या किंवा सरकारी खात्यांमध्ये रोजगार देण्यासाठी योग्य धोरणच नाही. सर्वच युवकांना सरकारी नोकरी देणे शक्य नसले, तरी खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये रोजगार देण्याचे धोरण आखावे आणि विधानसभेत रोजगाराबाबत श्वेतपत्रिका सादर करावी.

परराज्यांतील युवक गोव्यात नोकरीसाठी येऊन स्थायिक होऊ लागले तर राज्याच्या लोकसंख्येवर परिणाम होणार असून भविष्यात ते त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. गोव्यात बेरोजगारीची टक्केवारी वाढत आहे.

यात सरकारचा हात तर नाही ना?

ज्या फार्मा कंपन्यांनी पदे जाहीर केली आहेत, त्या सर्व पदांसाठीचे योग्य उमेदवार गोव्यात असूनही इतर राज्यांत मुलाखती घेण्याचे प्रयोजन काय? या कंपन्यांना इतर राज्यांतील कर्मचारी आणण्याचे धाडस तरी कसे होते. यात सरकार पक्षाचा हात नसेल ना, अशी शंकाही सरदेसाई यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Birthday: टाइम्स स्क्वेअरवर पंतप्रधान मोदींचा गौरव! भारतीय समुदायाने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; 140 कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Ballaleshwar Ganpati: पालीचा बल्लाळेश्वर भक्ताच्या नावाने का ओळखला जातो? अढळ भक्तीची ही पौराणिक कथा प्रत्येक गणेशभक्ताने जाणून घ्यायलाच हवी

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

SCROLL FOR NEXT