Goa Rain Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: राज्यात पुन्हा पावसाची संततधार; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला!!

Goa Rain Updates: पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rain Updates

पणजी: मान्सूनचा हंगाम मागे पडून बराच काळ लोटला असला तरीही गोव्यात पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. सकाळपासून सूर असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.

भारतीय हवामान खात्याकडून (IMD) उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 40-50kmph वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा देत आज (दि. 24 सप्टेंबर) रेड अलर्ट आणि उद्यासाठी (दि. 25 सप्टेंबर) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पणजी बसस्थानक आणि आजूबाजूच्या परिसरासह अनेक भागांमध्ये पाणी साचले. पर्वरीत उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असल्याने तिथेही पाणी साचल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय. तसेच फातोर्डा येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पाणी साचल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या फोंडा येथे विशेषतः मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून साखळी, म्हापसा आणि दक्षिण गोव्यातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. काही दिवस थांबलेल्या पावसाने पुन्हा अचानक जोर धरल्याने स्थानिकांना ये-जा करण्यात व्यत्यय येतोय. पावसाचा हाच वाढता जोर पाहता अधिकाऱ्यांकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT