Goa Recruitment  Dainik Gomantak
गोवा

Goa Recruitment: नोकरभरतीची जाहिरात आली 2019 मध्ये; परीक्षेसाठी उजाडले 2023

147 पदांच्या भरतीसाठी अखेर चार वर्षानंतर परीक्षा होणार

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Recruitment: गोव्यात 2019 मध्ये 147 पदांसाठी नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. तथापि, विविध कारणांमुळे ही नोकरभरती रखडली होती. मात्र, आता 2023 मध्ये म्हणजे सुमारे चार वर्षांनी या पदांसाठी परीक्षा होणार आहे.

लोवर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), ज्युनियर स्टेनोग्राफर, तलाठी, एमटीएस (मल्टीटास्किंग) या पदांसाठीची ही जाहिरात होती. त्यावेळी राज्यातील अनेक उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले होते.

या उमेदवारांमधूनही ही परीक्षा कधी होणार, याबाबत गेल्या चार वर्षामध्ये या उमेदवारांमधूनही वारंवार विचारणा होत होती. अखेर आता या पदांसाठी या महिन्यात परीक्षा होणार आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात एप्रिलमध्ये ही परीक्षा होणार आहे, असे कळते.

गोव्यातील बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. गेल्या काही काळामध्ये गोव्यातील बेरोजगारीचा प्रश्न सातत्याने चर्चेत आला होता. बेरोजगारीच्या सरासरीपेक्षा गोव्यातील बेरोजगारीची सरासरी जास्त आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनीही यावरून राज्यात रान उठवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT