Seven protesting Anganwadi teachers Dainik Gomantak
गोवा

अंगणवाडी सेविकांना सेवेत रुजू करा; काँग्रेसची मागणी

मुख्यमंत्र्यांनी प्रकरणात हस्तक्षेप करावा

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजीतील आझाद मैदान येथे आंदोलनाला बसलेल्या अंगणवाडी सेविकांना पुन्हा सेवेत रुजू केले पाहिजे. गेल्या 31 दिवसांपासून त्यांचे धरणे आंदोलन सुरू असून गेले दहा दिवस हे आमरण उपोषण त्या करत आहेत. त्यातील पौर्णिमा गावकर या अंगणवाडी सेविकेची प्रकृती खालावल्याने तिला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.

(Recruit Anganwadi workers goa Congress demand)

अंगणवाडी सेविका या महिला आणि बाल कल्याण खात्याअंतर्गत येतात, परंतु संबंधित मंत्र्यांना काही पडून गेलेले नाही. त्‍यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्वरित हस्तक्षेप करून त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्याची आवश्‍यकता आहे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

बांबोळी येथे गोमेकॉ संकुलात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सोबत सांताक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस व इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांना पूर्व सूचना न देताच कामावरून काढून टाकले होते. पुन्हा सेवेत रुजू करण्याची मागणी घेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे.

महिला आणि बाल विकास खात्याचे मंत्री असंवेदनशील असल्याचे यावरून सिद्ध होते. त्यासाठी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. एवढ्या दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. आता त्‍यांची मागणी पूर्ण केली पाहिजे, असे पाटकर म्हणाले.

आंदोलन करत असलेल्‍या अंगणवाडी सेविका पौर्णिमा गावकर यांची आज प्रकृती खालावली. गोमेकॉत दाखल करण्यात थोडासा विलंब झाला असता, तर काहीही झाले असते. त्यासाठी आता सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली पाहिजे. त्यांना आणखी आंदोलन करण्यासाठी सरकारने भाग पाडू नये, असे मत सांताक्रूझचे आमदार रुडाल्‍फ फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog: 2026 मध्ये तीन वेळा 'नवपंचम राजयोग'! 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल; गुंतवणुकीतून मिळणार तगडा फायदा

ED Raid: ईडीची गोव्यात मोठी कारवाई! 1268 कोटींची बेनामी मालमत्ता जप्त, शिवशंकर मायेकर टोळीच्या घोटाळ्यावर 'प्रहार'

Omkar Elephant: 'ओंकार'ला घाबरून विद्यार्थी घरात, शाळेत गेलेच नाहीत; तोरसे, पत्रादेवी येथे पुन्‍हा बागायतींत मुक्त संचार

Virat Kohli Gautam Gambhir Controversy: विराट-गंभीरमध्ये पुन्हा बिनसलं? ड्रेसिंग रुममधील 'तो' व्हिडिओ पाहून चाहते चक्रावले! Watch Video

Goa Factory Fire: नेसाई औद्योगिक वसाहतीतील फॅक्टरीला भीषण आग! अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचली 10 लाखांची मालमत्ता; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT