Margaon Municipality Dainik Gomantak
गोवा

Margao : मडगाव पालिकेचा धडाका; 52 लाखांची थकबाकी 21 दिवसात वसूल

मडगाव नगरपालिकेची काही वर्षांपासून रखडून पडलेली कर थकबाकीची वसुली 21 दिवसांच्या आत 52 लाख रुपयांच्या घरात पोहोचली असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.

Shreya Dewalkar

फातोर्डा: मडगाव नगरपालिकेची काही वर्षांपासून रखडून पडलेली कर थकबाकीची वसुली 21 दिवसांच्या आत 52 लाख रुपयांच्या घरात पोहोचली असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली. सोनसोडो कचरा यार्डवरील कचरा समस्या सोडविण्याच्या कामालाही प्रधान्य देण्यात आले असून दर दोन दिवसांनी या ठिकाणाचा आढावा घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

(Margaon Municipality)

मागील 15 दिवसांच्या काळात चाळीस लाख रुपये नगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. आता 21 दिवसांत थकबाकी वसुली 52 लाख 13 हजार रुपयांवर आली आहे. यासाठी थकबाकी वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे. काहीवेळा खासगी वाहन वसुलीसाठी घेऊन जात आहेत. याविषयी त्यांना वाहनासाठी पेट्रोल खर्च देण्यात यावा, अशी मागणी पालिकेकडे करणार, असे त्यांनी सांगितले.

मडगाव नगरपालिकेला रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना महिन्याचे 38 लाख रुपये पगार द्यावा लागत आहे. याबरोबरच नगरपालिकेतील इतर कामाचा खर्च 20 लाख रुपये असा आहे. कायमस्वरूपी कामगार मिळून एकंदरीत नगरपालिकेला दर महिन्याला 2.5 कोटी रुपये बाहेर काढावे लागत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT