Goa Drug Case: गोव्यात ड्रग्ज विरोधातील कारवाई आणखी तीव्र; कळंगुटमधून आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या

काही दिवसांपूर्वी अंमलीपदार्थप्रकरणी गोव्यात आलेल्या एका तरुणाला अटक करण्यात आली होती. तेव्हा त्याने दिलेल्या माहितीनुसार इतरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.
Drugs
Drugs Dainik Gomantak

हणजुण: हणजुण पोलिसांनी 30 नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या पाठपुराव्याच्या तपासात, कळंगुट येथील नीलेश अरविंद पाटील नावाच्या आणखी एका आरोपीला अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. याआधी आणखी एक आरोपी लीलेश कश्यप याला बेकायदेशीरपणे 50 लाख रुपयांचे अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

(Another accused from Calangute arrested in Goa drug case)

Drugs
Goa Temple: पोर्तुगिजांकडून उद्ध्वस्त धार्मिक स्थळांबाबत निवेदनाला प्रतिसाद

काही दिवसांपूर्वी अंमलीपदार्थप्रकरणी गोव्यात आलेल्या एका तरुणाला अटक करण्यात आली होती. तेव्हा त्याने दिलेल्या माहितीनुसार इतरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अंमलीपदार्थ पुरवठा करणाऱ्या व्यक्तीशी बोगस ग्राहकाच्या आधारे संपर्क साधण्यात आला. त्याने एका तरुणीला रेल्वेने गांजा घेऊन पाठवतो, असे सांगून त्या तरुणीच्या वर्णनाची माहिती दिली होती. ती मांडवी एक्स्प्रेसने येणार असून करमळी रेल्वे स्थानकावर उतरेल, अशी माहिती दिली होती.

या माहितीवरून अंमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलिस काल संध्याकाळी करमळी रेल्वे स्थानकात उपस्थित होते. पोलिसांचा बोगस ग्राहकही तेथे तैनात करण्यात आला होता. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वे आली व ती तरुणी रेल्वे स्थानकावर उतरली. बोगस ग्राहकाने पोलिसांना दूरवरून तरुणी दाखवली. पोलिस पथकाने तिच्या बॅगची झडती घेतली असता आतमध्ये गांजा सापडला. तिला ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला.

Drugs
Babush Monserrate यांना तात्पुरता दिलासा; बलात्कार आणि पोलिस स्टेशन हल्ला प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

झारखंडच्या युवतीला अटक

अंमलीपदार्थाचा पुरवठा करण्यासाठी गोव्यात आलेल्या झारखंडच्या युवतीला अटक करण्यात आली होती. मुस्कान रोहित करूआ (19) असे तिचे नाव आहे. अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने करमळी रेल्वे स्थानकावर काल ही कारवाई केली. तिच्याकडून 6 लाख रुपयांचा सुमारे 6 किलो गांजा जप्त करण्यात आला होता.

तिच्याविरुद्ध अंमलीपदार्थविषयक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ड्रग्ज व्यवहाराशी संबंधित असलेल्या तिच्या इतर साथीदारांचाही शोध पोलिस घेत आहेत. संशयित मुस्कान ही मूळची झारखंड येथील असून ती गेली काही वर्षे मुंबईत राहत असून डान्स बारमध्ये नृत्य करण्याचे काम करते. झटपट पैसे मिळवण्याच्या आमिषाने ती या ड्रग्ज साठा पोहचवण्याचे कामात गुंतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com