Old Goa tourist Dainik Gomantak
गोवा

Illegal Building: अस्तित्वात नसलेल्या घर क्रमांकाची नोंद

Illegal Building: जुने गोवेतील प्रकार: 15 हजार चौ. मी. जागेवर अतिक्रमण

दैनिक गोमन्तक

Illegal Building: जुने गोवा परिसरात साधारण 15 हजार चौ. मी. जागेवर अतिक्रमण झाले आहे. जमिनीवर घर नसतानाही त्यांना पंचायतीने घरक्रमांक दिले गेले आहेत, परराज्यातील लोकांनी बेकायदेशीररीत्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत, असा आरोप ग्लेन काब्राल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केलेला आहे. याप्रसंगी प्रजल साखरदांडे, शंकर पोळजी यांच्यासह इतर उपस्थित होते.

काब्राल म्हणाले, ज्या पद्धतीने यापूर्वी पेडण्याचे घर दाखवून राजकीय व्यक्तीने बेकायदा बंगला बांधल्याचा प्रकार गाजत आहे. येथे घरे नसतानाही नोंद दाखवलेली आहे. एका सर्व्हे क्रमांकावर चार घरे दाखविली आहेत, तरीही येथे एक अधिक वरील मजला अशी इतर घरे दाखविली आहेत. त्यांना घरक्रमांकही दिलेला आहे. नसलेली घरे दाखविण्याचा हा प्रकार आहे. हे लपविण्यासाठी येथील संतांची म्हणजेच सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे नाव वापरून कंपन्या दाखविल्या आहेत.

परराज्यातील लोकांनी जी घरे दाखविली आहेत, तेवढीच घरे दाखवायला हवे होते. आपण पंचायतीकडे तक्रार केली आहे, त्यांनी आपणास चौकशी करू म्हणून सांगितले आहे. नसलेल्या घरांना क्रमांक दिलेले आहेत, ते २००८, २००९ मध्ये दिले गेले आहेत. त्यामुळे आता पंचायत म्हणणार आपणास त्याची माहिती नसेल, ते क्रमांक कसे दिले ते. तरीही याची चौकशी व्हायला हवी, अशी आपली मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

हणजूण येथे पर्यटकांच्या वाहनाची ट्रान्सफॉर्मरला धडक; दारूच्या बाटल्या सापडल्याने संशयाचे वातावरण!

Viral video: चालत्या कारच्या छतावर चढले अन्… तरुणांचा धोकादायक स्टंट व्हायरल; व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

BCCI Election: बीबीसीआयच्या निवडणुकीत गोवा क्रिकेट असोसिएशनचा मतदार असणार का? शनिवारी होणार निर्णय

गोव्यात असणाऱ्या परराज्यांतील कंपन्यांनी येथेच मुलाखती घेऊन स्थानिकांना रोजगारास प्राधान्य द्यावे; CM सावंतांचे यार्वीच निर्देश

SCROLL FOR NEXT