Art and Culture Minister Govind Gawde Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: विद्यार्थिनीचा विनयभंगाप्रकरणी शिक्षकाच्‍या बडतर्फीसाठी शिफारस

Goa Crime News: क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी ही माहिती दिली. या शिक्षकाची क्रीडा खात्‍यातर्फे शारीरिक शिक्षक म्‍हणून नेमणूक करण्‍यात आली होती.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: फातर्पा येथील एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्‍याच्‍या आराेपाखाली कुंकळ्‍ळी पोलिसांनी अटक केलेल्‍या आणि सध्‍या कोलवाळच्‍या तुरूंगात स्‍थानबद्ध असलेला पीई शिक्षक रमेश गावकर याला सेवेतून बडतर्फ करण्‍यासाठी क्रीडा खात्‍याने सरकारकडे शिफारस केली आहे.

क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी ही माहिती दिली. या शिक्षकाची क्रीडा खात्‍यातर्फे शारीरिक शिक्षक म्‍हणून नेमणूक करण्‍यात आली होती.

या शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी ग्रामस्‍थ आणि विद्यार्थ्यांच्‍या पालकांनी यापूर्वी केली होती. या शिक्षकाने आपल्‍याला जामीन मिळावा म्‍हणून बाल न्‍यायालयात अर्ज केला असून २७ सप्‍टेंबर रोजी हा अर्ज सुनावणीस येणार आहे.

या शिक्षकाने यापूर्वी मळकर्णे शाळेत शिकविताना असाच प्रकार केला होता अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली होती. पोलिसांनी यासंबंधीची संपूर्ण माहिती गोळा केली असून ही माहिती बाल न्‍यायालयासमोर ठेवली जाणार आहे, अशी माहिती कुंकळ्‍ळी पोलिसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT