Shefali Vaidya | South Goa BJP Shefali Vaidya X Account
गोवा

Shefali Vaidya: 'देश आणि हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची पोचपावती, कोणी प्रचार तर कोणी निधी द्यायला तयार'

Shefali Vaidya: कालपासून लोक माझ्यावर जे प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करत आहेत त्यामुळे मी भारावून गेलीय आणि मला माझ्या समर्थकांचे जाहीर आभार मानायचे आहेत

Pramod Yadav

Shefali Vaidya

दक्षिण गोव्यात भाजप लोकसभेसाठी महिला उमेदवाराचा विचार करत असल्याची माहिती समोर आलीय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील याबाबत माहिती देत महिला उमेदवारांचे नावे पाठवली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

दक्षिणेतून हिंदुत्ववादी कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. याबाबत विविध माध्यमांनी वृत्त प्रसारित केले आहे. शेफाली वैद्य यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना देश आणि हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याचे म्हणत, त्यांना समर्थन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.

"दक्षिण गोवा खासदार जागेसाठी संभाव्य उमेदवारांपैकी एक म्हणून माझे नाव विचारात घेण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान मी समजते."

"देश आणि हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. यामुळे देशासाठी काम करण्याचा माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे. कालपासून माझा फोन सातत्याने वाजत आहे. माझ्या नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी, मला शुभेच्छा देणारे शेकडो लोकांचे फोन आणि संदेश आलेत."

"अनेकांनी स्वच्छेने माझ्यासाठी प्रचार करण्याची इच्छा व्यक्त केली, काहींनी प्रचारासाठी निधी देण्याची तर, काहीजणांनी काही महिने सुट्टी घेऊन माझ्यासाठी काम करण्याची इच्छा दर्शवली."

"वृत्त काहीही असो, कालपासून लोक माझ्यावर जे प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करत आहेत त्यामुळे मी भारावून गेलीय आणि मला माझ्या समर्थकांचे जाहीर आभार मानायचे आहेत."

"चांगल्या लोकांकडून मिळणारा हा मूक पाठिंबाच माझ्या कामाचा कणा असून, माझ्यावर वैयक्तिक हल्ले, शिवीगाळ आणि धमक्या न जुमानता मला पुढे जाण्याची प्रेरणा देत राहतात."

मी कृतज्ञ आणि नम्र आहे!

चार महिला उमेदवार रांगेत

दक्षिण गोव्यातून भाजपचा चेहरा कोण असणार यावर अद्याप निर्णय झाला नसून, यापूर्वी बाबू कवळेकर, नरेंद्र सावईकर आणि दामू नाईक यांच्या नावाची चर्चा होती.

दरम्यान, भाजप दक्षिणेत महिला उमेदवाराचा विचार करत असल्याचे समोर आले असून, सध्या चार नावे चर्चेत आहेत. यात शेफाली वैद्य यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, सुवर्णा तेंडुलकर आणि विद्या गावडे यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यात दक्षिणेतून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT