Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Goa Cyber Fraud: ‘रिचार्ज पॅक’च्या नावाखाली गोकुळवाडी-साखळी एका महिलेची ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.

Sameer Panditrao

Online Scam Goa : ‘रिचार्ज पॅक’च्या नावाखाली गोकुळवाडी-साखळी एका महिलेची ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या महिन्यात गोकुळवाडा-साखळी येथील अनुषा श्रीकांत वाडकर या महिलेला तिच्या मोबाईल फोनवर दोन वेगवेगळ्या नंबरवरून अज्ञात व्यक्तीकडून कॉल आले.

‘मी एका नामांकित कंपनीचा अधिकारी आहे. रिचार्ज पॅकसाठी अमुक-अमुक पैसे भरावे लागतील’ असे सांगून त्‍या अज्ञात व्यक्तीने अनुषा हिच्या बँक खात्यासंबंधी डिटेल्स घेऊन नंतर तिची फसवणूक केली.

आपल्याला ४४ हजार ३४० रुपयांना हातोहात फसवले असल्‍याची जाणीव होताच अनुषा यांनी डिचोली पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी भारतीय न्‍यायदंड संहितेच्‍या ३१८ (२, ३ आणि ४) या कलमाखाली गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. डिचोली पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT