Goa Railway | Dainik Gomantak
गोवा

Goa Railway: रेल्वे दुपदरीकरणावरील स्थगिती मागे घेण्यासाठी रेल्वेच्या हालचाली

आरईसीने आता काले ते सावर्डे यादरम्यान रेल्वे दुपदरीकरणावर घातलेली बंदी उठविण्याची केंद्रीय मंत्रालयाकडे शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Railway: काले ते सावर्डे यादरम्यानच्या सुमारे 1.9 हेक्टर जमिनीत पूर्वी रेल्वे दुपदरीकरणावर घातलेली बंदी उठविण्याची शिफारस केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची प्रादेशिक अधिकार प्राप्त समिती (आरईसी) करू पाहत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 9 मे 2022 रोजीच्या आदेशात, कॅसलरॉक आणि कालेदरम्यान रेल्वे दुहेरीकरणासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने दिलेली मान्यता रद्द केली होती.

तथापि, अलीकडेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे विकास निगमने आरईसीला संरक्षित क्षेत्राबाहेर पडणाऱ्या दुहेरीकरणाच्या कामास पुढे जाण्याची परवानगी देण्याची आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाला मंजुरीचा स्थगिती आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सरकारने 3 जानेवारी 2023 रोजी स्थगिती आदेश मागे घेण्याची विनंती आरईसीकडे पाठवली. सदरच्या प्रस्तावावर चर्चा करताना आरईसीने सांगितले की, काले हा विभाग भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि त्याच्या इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येतो.

काले-सावर्डे विभागात खासगी जंगलासह 1.9 हेक्टर असलेले हे क्षेत्र कोणत्याही संरक्षित क्षेत्र किंवा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या बाहेर येत असल्याने या क्षेत्रासाठीचा आदेश मागे घेण्याच्या परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे शिफारस केली जाऊ शकते.

आरईसीने आता या विस्तारासाठी स्थगिती आदेश मागे घेण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडे शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे.

या समितीने म्हटले आहे की, सदरच्या खाजगी वनक्षेत्राच्या पलीकडे असलेल्या कुळे-सावर्डे विभागाचा भाग हा भगवान महावीर वन्यजीव अभयारण्याच्या (पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील) झोनमध्ये येतो. त्यामुळे एजन्सीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पूर्ण पालन करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT