Rebel MLA of ShivSena Escapes From Goa Airport  Dainik Gomantak
गोवा

बंडखोर आमदारांचा पत्रकारांना चकवा

माध्यमांना हुलकावणी देत विमानतळाबाहेर; ‘दाबोळी’वर देखाव्यासाठी पोलिस

आदित्य जोशी

वास्को : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे शिवसेनेचे बंडखोर 39 आमदार बुधवारी रात्री 10 वाजता गोव्यात स्पाईस जेटने दाखल झाले. मात्र, त्यांनी दाबोळी विमानतळावरून मुख्य प्रवेशद्वाराने न जाता कार्गो गेटने जात प्रसार माध्यमांना हुलकावणी दिली. (Rebel MLA's of ShivSena Escapes From Goa Airport)

गुरुवारी सकाळी ते मुंबईला रवाना होणार आहे. बंडखोर आमदार गोव्यात दाखल होणार असल्याने दाबोळी विमानतळावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच राष्ट्रीय तसेच स्थानिक प्रसार माध्यमांनी विमानतळावर सकाळपासूनच गर्दी केली होती.

बंडखोर आमदार दाबोळी विमानतळावर रात्री 10 वाजता दाखल झाले. त्यासाठी काही राष्ट्रीय प्रसार माध्यमे मुंबईहून आली होती. राज्यातील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तर दुपारपासूनच विमानतळाबाहेर ताटकळत उभे होते. हे आमदार सात वाजता दाखल होणार, नंतर साडेनऊ वाजता दाखल होणार, असे सांगण्यात आले. शेवटी 10 वाजता बंडखोर आमदार दाखल झाले. पण पावणेअकरा वाजले तरी नेतेमंडळी बाहेर येत नसल्याने माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारपूस केली असता, या आमदारांच्या बसेस कार्गो गेटमधून निघून गेल्याचे सांगण्यात आले.

दाबोळी विमानतळावर राष्ट्रीय व राज्यातील असे मिळून 30 हून अधिक प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बाहेर वाट पाहात उभे होते. त्यांच्या पदरी निराशा पडली. दुपारपासून उपाशीपोटी ताटकळत विमानतळावर उभे असलेले पत्रकार रात्री उशिरापर्यंत आमदारांची भेट न झाल्याने हिरमुसले. येथील मुख्य प्रवेशद्वारावरील पोलिस बंदोबस्त हा केवळ देखावा होता.

या आमदारांच्या आगमनामुळे दाबोळी विमानतळावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलिस महासंचालक जसपाल सिंग, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक, मुरगाव तालुका पोलिस उपअधीक्षक राजेश कुमार, उपअधीक्षक नीलेश राणे, तुषार वेर्णेकर, पोलिस निरीक्षक रवी देसाई, वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक, मुरगावचे पोलिस निरीक्षक राघोबा कामत, दाबोळी वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर, दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांच्यासह पोलिस फौजफाटा होता.

बंडखोर आमदार दोनापावला येथील ताज रिसॉर्टमध्ये उतरले होते. या हॉटेलमध्ये या आमदारांसाठी 74 रूम बुक केल्या होत्या. या आमदारांना पहिल्यांदा गुजरातमध्ये नेले होते. त्यानंतर गुवाहाटीला ते काही दिवस होते आता ते गोव्यात आले. हा तीन भाजपशासित राज्यांतील त्यांचा प्रवास 3-जी ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT