पणजी: लग्नसोहळे, परिषदा करण्याचे ठिकाण तसेच पर्यटकांसाठी मौजमजेचे ठिकाण म्हणजे गोवा असे समजणाऱ्यांना गोवा मनोरंजन सोसायटीच्या (इएसजी) पिकॉक नियतकालिकेमुळे गोव्याची खरी ओळख होईल, असे मत ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारप्राप्त साहित्यिक दामोदर मावजो यांनी येथे व्यक्त केले. ही नियतकालिका गोव्याच्या सीमा ओलांडून बाहेर जाण्याची गरजही त्यांनी प्रतिपादिली.
(real identity of Goa will be due to 'Peacock')
गोवा मनोरंजन सोसायटीच्या पिकॉक या सांस्कृतिक नियतकालिकेच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन आज गुरुवारी मॅकेनिझ पॅलेस थिएटरमध्ये मावजो यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठवर पिकॉकचे संपादक विवेक मिनेझिस व जुझे लॉरेन्स तसेच सचिन चाटे उपस्थित होते. ही नियतकालिका वेगळी असून वाचक रस घेऊन ती वाचतील
असा विश्वास मावजोंनी व्यक्त केला.
प्रसिद्ध छायाचित्रकार आसावरी कुलकर्णी यांनी स्क्रीनवर कुणबी महिलांचे सौंदर्य टिपलेली छायाचित्रे दाखवून माहिती दिली. नियतकालिकेचे मुखपृष्ठ बनविलेल्या चित्रकार अमृता पाटील यांनी सांगितले की, गोवा बघून आपण जे शिकले तर शाळेत किंवा स्टुडिओत शिकू शकले नाही. इम्फना कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.