Bhagwant Bhaskar Gavkar Dainik Gomantak
गोवा

शिरगाव पंचायतीच्या सरपंचपदी भगवंत गावकरांची फेरनिवड

शिरगाव पंचायतीच्या (Shirgaon Panchayat) सरपंचपदाची माळ अखेर अपेक्षेप्रमाणे भगवंत भास्कर गावकर (Bhagwant Bhaskar Gavkar) यांच्या गळ्यात पडली आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: शिरगाव पंचायतीच्या (Shirgaon Panchayat) सरपंचपदाची माळ अखेर अपेक्षेप्रमाणे भगवंत भास्कर गावकर (Bhagwant Bhaskar Gavkar) यांच्या गळ्यात पडली आहे. सोमवारी झालेल्या निवडणुकीत त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. शिरगाव पंचायतीच्या रिक्त सरपंच पदाची निवड करण्यासाठी आज सकाळी पंचायत मंडळाची बैठक घेण्यात आली. बैठकीस पाचपैकी उपसरपंच सौ. विजया मांद्रेकर यांच्यासह भगवंत गावकर, सदानंद गावकर आणि कल्पिता जी. घाडी हे चार पंचसदस्य उपस्थित होते. तर पदच्युत सरपंच अच्युत गावकर अनुपस्थित होते.

सरपंच पदासाठी भगवंत गावकर यांनी एकट्यानेच अर्ज भरला. या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून अनुक्रमे सदानंद गावकर आणि विजया मांद्रेकर यांनी सही केली होती. निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित असलेले डिचोली गट विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी प्रतापराव राणे यांनी हा अर्ज ग्राह्य धरून भगवंत गावकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी पंचायत सचिव स्वप्नज पेडणेकर यांनी सहकार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT