Ravindra Bhavan  Dainik Gomantak
गोवा

Ravindra Bhavan : रवींद्र भवनचे काम लवकर पूर्ण करा : सभापती रमेश तवडकर

गोमन्तक डिजिटल टीम

Ravindra Bhavan : आगोंद, काणकोण रवींद्र भवनच्या रखडलेल्या बांधकामाची सभापती रमेश तवडकर यांनी पाहणी केली. संपूर्ण भवनच्या बांधकामाचा अधिकारी व ठेकेदाराकडून आढावा घेतला.

त्यानंतर संपूर्ण काम येत्या २६ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली. त्यांच्यासोबत गोवा साधन सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी व ठेकेदार नवरदेव सिंह उपस्थित होते.

काणकोणात ५९ कोटी रु. खर्चून उभारण्यात येणाऱ्या रवींद्र भवनच्या या प्रकल्पाचे‌ बांधकाम ७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. कामाला गती नसल्याने हे काम रखडले. त्यानंतर सभापती तवडकर यांनी त्याचा सतत पाठपुरावा सुरू केला.

३ रोजी गोवा साधन‌ सुविधा विकास महामंडळाचे अधिकारी तसेच प्रकल्पाचे ठेकेदार यांची महत्त्वाची बैठक घेऊन काम त्वरित पूर्ण करण्याची सूचना केली.

जीएसआयडीसीचे सरव्यवस्थापक दिलीप जोशी, युसीजेचे सल्लागार संजय नाईक, जीएसआयडीसीचे व्यवस्थापक अनुप, उपव्यवस्थापक परेश नाईक, उपव्यवस्थापक विश्रांती च्यारी, उपव्यवस्थापक चंद्रशेखर नाईक तसेच कृष्णा बिल्डर्सचे ठेकेदार नरदेव सिंह व त्यांचे विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

अन्य उपस्थितांमध्ये नगराध्यक्ष रमाकांत नाईक गांवकर, नगरसेवक सायमन रिबेलो, हेमंत नाईक गांवकर, गंधेश मडगावकर, नारसिस्को फेर्नांडीस, आगोंदचे सरपंच प्रितल फर्नांडिस, खोतिगावचे सरपंच आनंदू देसाई, लोलयेंचे प्रभार सरपंच चंद्रकांत सुधीर, माजी नगराध्यक्ष किशोर शेट, मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई, सरचिटणीस दिवाकर पागी, विशांत गावकर, सचिव संजू तिळवे, उपाध्यक्ष शाबा नाईक गांवकर, नारायण देसाई व अन्य उपस्थित होते.

पुन्हा आढावा बैठक घेणार!

१९ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत‌ दिली होती. सभापती तवडकर यांनी गोवा साधन सुविधा विकास महामंडळाच्या अधिकारी वर्गाला काम रेंगाळण्यास कारणीभूत कोण? या प्रश्नावर चांगलेच फैलावर घेतले.

एसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार व मुंबईतील आर्किटेक्ट यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला. एकमेकांवर दोषारोप न करता संघटितपणे काम करण्याचा सल्ला देऊन कोणत्याही परिस्थितीत २६ जानेवारीपर्यंत करावे, असे यावेळी ठरले.

येत्या १५ दिवसानंतर पुन्हा आढावा बैठक घेऊन आढावा घेण्यात येणार असल्याचे सभापती तवडकर यांनी उपस्थितांना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT