Agriculture Minister Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023: स्पर्धकांनो, वेळेचे काटेकोर पालन करा : रवी नाईक

फोंड्यात 1 मार्चला शिगमोत्सव कार्यालयाचे उद्घाटन

दैनिक गोमन्तक डिजिटल

फोंड्यातील शिगमोत्सवात यंदा वेळेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत एकमत झाले. कोविड महामारीनंतर प्रथमच राज्यस्तरीय शिगमोत्सवाला यंदा सुरवात होत असल्याने यावर्षीचा शिगमोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबत (रविवारी) फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात झालेल्या बैठकीत चर्चा झाली.

यावेळी फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक तसेच अंत्रुज शिगगोत्सव समितीचे अशोक नाईक, गुरुनाथ नाईक, किशोर नाईक व नगरसेवक आनंद नाईक उपस्थित होते.

फोंडा तालुका अंत्रुज शिगमोत्सव समितीतर्फे गेली अनेक वर्षे फोंड्यात शिमगोत्सव साजरा केला जातो. राज्यस्तरीय सरकारी पातळीवरील शिगमोत्सव यंदा फोंड्यात येत्या 8 मार्च रोजी होणार असून यावेळी चित्ररथ, रोमटामेळ तसेच लोककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय दोन स्तरावर वेशभूषा स्पर्धाही घेण्यात येणार असून स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. या शिगमोत्सवात येत्या 1 मार्च रोजी संध्याकाळी 5 वा. तिस्क-फोंडा येथे शिगमोत्सव कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमाला कृषीमंत्री रवी नाईक तसेच कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, फोंडा नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष अर्चना डांगी तसेच इतर नगरसेवक व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

"शिगमोत्सव हा गोमंतकीय परंपरेचे दर्शन असून लोककला आणि लोकसंस्कृतीचे रक्षण करणाऱ्या या उत्सवामुळे सरकारी शिगमोत्सवात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात. त्यामुळे शिगमोत्सव हे एकतेचे प्रतीक असून यंदाच्या शिगमोत्सवात शिगमोप्रेमी तसेच स्पर्धक पथकांनी वेळेत उपस्थित रहावे आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे."

- रवी नाईक (कृषीमंत्री)

फेटे बांधण्याची कार्यशाळा

3 मार्च रोजी फेटे बांधण्याची कार्यशाळा होणार असून 4 रोजी संध्याकाळी 6 वाजता शिगमोत्सव आयोजनातील इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला सदस्यांची उपस्थिती असेल.

5 रोजी दुपारी 2.30 वाजता म्हार्दोळ येथे महालसेला नमन घालण्यात येणार असून 8 रोजी शिगमोत्सव मिरवणूक होईल. ही मिरवणूक संध्याकाळी ठीक 4 वाजता तिस्क - फोंडा येथून सुरू करण्यात येणार आहे. न्यायालयीन ध्वनीप्रदूषणाच्या आदेशानुसार रात्री दहापर्यंतच मिरवणूक निघेल. त्यामुळे स्पर्धकांनी वेळेत उपस्थित रहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT