Cortalim panchayat : ग्रामसभा नोंदी टंकलिखित असाव्यात

कुठ्ठाळी ग्रामसभेत ठराव : यापुढे शुल्क थकवणाऱ्या आस्थापनांवर खटला
cortalim village panchayat
cortalim village panchayat Dainik Gomantak
Published on
Updated on

Cortalim panchayat : कुठ्ठाळी पंचायतीच्या (रविवारी) सकाळी 10 वाजता झालेल्या ग्रामसभेतील नोंदी नोंदवहीत टंकलिखित करून नोंदवाव्यात, असा ठराव संमत करण्यात आला. कारण एका पंचायत सचिवाने लिहिलेले हस्तलिखित दुसऱ्या सचिवांना कळत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी असे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

औद्योगिक वसाहतीतील काही आस्थापनांकडून शुल्क भरले जात नसल्याने या विषयावरून खटला दाखल करण्यात यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला. व्यासपीठावर सरपंच सेनिया परेरा, उपसरपंच दिव्या रायकर, पंच आंजेला फुर्तादो, मेलवीन वाझ, ओलिंडा लोबो, पंचायत सचिव अंकिता घोगळे उपस्थित होते.

cortalim village panchayat
Gomantak Special Report : गोव्यात वेश्‍या आणि ड्रग्ज व्यवसायामध्ये ‘बॉबी’ची दहशत; गुन्हेगारीला बळ

तसेच पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांकडून आपसातील वाद सामोपचाराने सोडवणे,कंत्राटदारांकडून कचरा व्यवस्थितपणे गोळा केला जात नसल्याने त्याला याबाबत कचरा गोळा करण्याच्या बाबतीत कसलीच हयगय सहन केली जाणार नसल्याचे आदेश द्यावेत. प्रत्येक प्रभागात दोन घर मालकांना सॉकपीट योजनेंतर्गत ती देण्यात यावी, असा ठराव केला.

भाडेकरूंची ओळख पडताळणी व्हावी

कचरा शुल्क न देणाऱ्यांना नोटीस बजावणे, भाडेतत्त्वावर राहणाऱ्या बिगर गोमंतकीय मजुरांवर तसेच भाडेकरूंवर पाळत ठेवण्यासाठी त्यांच्याकडून ओळख पडताळणी अर्ज भरून घेणे आदी विविध विषयांवर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. शिधापत्रिकेबाबत योग्य चौकशी साठी नागरी पुरवठा खात्याला पत्रव्यवहार करण्यात यावा, असाही ठराव घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com