Ravi Naik, Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Usgao Market: उसगावच्या मार्केटला देणार 'रवी नाईक' यांचे नाव! विश्‍वजीत राणे यांची घोषणा; 25 कोटी खर्चून उभारणार प्रकल्प

Ravi Naik: दिवंगत माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे नाव उसगावच्या नूतन मार्केट संकुलाला देण्यात येईल, असे आमदार तथा नगर विकासमंत्री विश्‍वजीत राणे यांनी जाहीर केले.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: राजकारणात गेली अनेक वर्षे राहून आपल्यापरीने समाजकार्याला चालना देणारे दिवंगत माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे नाव उसगावच्या नूतन मार्केट संकुलाला देण्यात येईल, असे आमदार तथा नगर विकासमंत्री विश्‍वजीत राणे यांनी जाहीर केले.

उसगाव-गांजे पंचायतीतर्फे राज्य नगर विकास यंत्रणेच्या सहकार्याने तिस्क-उसगाव येथील मार्केट संकुलाची पुनर्बांधणी आणि नूतनीकरणाच्या कामाच्या पायाभरणी समारंभात विश्‍वजीत राणे यांनी घोषणा करून रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, सरपंच प्रकाश गावडे तसेच इतर पंचसदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. उसगावच्या पंचायत सभागृहात हा कार्यक्रम झाला.

विश्‍वजीत राणे म्हणाले की, रवी नाईक हे या भागाचे आमदार असताना त्यांनी अनेक विकास प्रकल्प राबवले. लोकांना जे चांगले ते देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.

तिस्क-उसगाव येथे मार्केट संकुल उभारून त्यांनी मार्केटचा विस्तार केला, ज्यामुळे ग्राहक आणि विक्रेत्यांना सोयिस्कर ठरले. आता या मार्केटची पुनर्बांधणी करण्यात येणार असून उसगावात नवीन मार्केट संकुल उभारावे, अशी रवी नाईक यांची इच्छा होती, ती पूर्णत्वास येणार आहे.

हे मार्केट संकुल नव्याने बांधण्यात येईल. दिवंगत नेत्याचे स्मरण करताना या संकुलाला त्यांचे नाव देण्यात येईल. तिस्क-उसगाव येथील या मार्केट संकुलाच्या निर्माणासाठी पंचवीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

‘सी केअर’ आरोग्य सुविधा

या मार्केट संकुलात मल्टिप्लेक्ससह सर्वसामान्यांना आवश्‍यक त्या सुविधा, ‘सी केअर’ आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून एका रुग्णवाहिकेत तीन कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. एखादी व्यक्ती आजारी असल्यास त्याच्या घरी ही रुग्णवाहिका जाईल आणि तपासणी करील. त्यानंतर आवश्‍यक असल्यास संबंंधित व्यक्तीला इस्पितळात दाखल करण्यात येणार असून वाळपई मतदारसंघातील प्रत्येकाच्या आरोग्याची खबरदारी घेण्यात येईल, अशी ग्वाही विश्‍वजीत राणे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT