Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

रवी नाईक हेच फोंड्याचे ‘सिंकदर’

रवींच्या विजयामुळे फोंड्यात प्रथमच कमळ फुलले आहे.

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: फोंड्यातील ‘कॉंटे की टक्कर’च्या लढतीत शेवटी बाजी मारली ती माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनीच. सुरवातीच्या सहा राऊंडापर्यंत मगोपचे डॉ. केतन भाटीकर हे आघाडीवर होते. पण, शेवटच्या दोन राऊंडात रवीने भाटीकरांना ‘ओव्हरटेक’ केले. नंतर भाटीकरांच्या मागणीनुसार फेरमतमोजणी होऊनसुध्दा रवींच्या आघाडीत फरक पडला नाही. रवींच्या विजयामुळे फोंड्यात प्रथमच कमळ फुलले आहे.

वास्तविक फोंड्यातील परिस्थिती ही रवींच्या विरोधात होती. भाजपच्याच फोंड्यातील काही नेत्यांनी रवींच्या विरोधात प्रचारही केला होता. भाजपचे माजी गटाध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी तर उघडपणे मगोपचे डॉ. केतन भाटीकर यांना पाठिंबा दर्शविला होता. दुसरे एक भाजपचे पदाधिकारी संदीप खांडेपारकर यांनी तर अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली होती. बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘छुपे रुस्तम’ बनून रवींच्या विरोधात काम केले होते.

तरीसुध्दा या सगळ्या गोष्टींना रवी पुरून उरले असल्याचे आता सिध्द झाले आहे. फोंड्यात लढत कॉंग्रेसचे राजेश वेरेकर व मगोपचे डॉ. केतन भाटीकर यांच्यात असून रवी तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाणार असल्याची चर्चा सुरू होती. पण रवींनी आपणच फोंड्याचे ‘सिंकदर’ असल्याचे परत एकदा सिद्ध करून दाखवले.

सुरवातीचे पाच राऊंड झाल्यानंतर फोंड्यात मगोपच्या कार्यकर्त्यांतर्फे बऱ्याच ठिकाणी फटाके वाजवले गेले होते. भाटीकर निवडून आलेच असे गृहीत धरून सोशल माध्यमांवरून भाटीकरांवर अभिनंदनाचा वर्षावही सुरू झाला होता. पण खडपाबांध व तिस्क येथील मतमोजणी सुरू झाल्यानंतर चित्र बदलेले व विजयश्रीने रवींच्या गळ्यात माळ घातली. फोंड्यातून निवडून येण्याची रवींची ही सहावी वेळ. चार वेळा ते कॉंग्रेसच्या उमेदवारीवर तर एक वेळा मगोपच्या व आता भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. रवी हे कोणत्याही पक्षाच्या बाजारपेठेतील ‘चलनी नाणे’ असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

त्यांच्याविरुद्ध काहीजणांनी खालच्या थराचा प्रचार केल्याचे यावेळी दिसून आले. त्यांच्या आरोग्याबद्दलही अपप्रचार करण्यात आला होता. पण, तरीही फोंड्यातील मतदारांनी रवींवर विश्वास दाखवला. डॉ. केतन भाटीकर हे दुसरे तर कॉंग्रेसचे राजेश वेरेकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

कॅथलिक मतदारही रवींच्या पाठीशी

एरव्ही भाजपच्या वाटेला न जाणारे मुस्लिम, कॅथलिक मतदारही यावेळी भाजपचे असून सुध्दा रवींना मते दिल्याचे दिसताहेत. पण, त्याचबरोबर एवढ्या कमी फरकाने विजयी होण्याचा ही रवींच्या राजकीय कारकीर्दीतील पहिलीच वेळ. आतापर्यंत ते कमीत कमी दीड हजार मतांच्या फरकाने निवडून यायचे. मागच्या वेळी तर त्यांनी 3050 मतांनी विजय प्राप्त केला होता. पण यावेळी फक्त 77 मतांची आघाडी असली तरी शेवटी ‘जो जीता वही सिंकदर’ असेच म्हणावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT