Ravanfond Flyover Dainik Gomantak
गोवा

Margao: रावणफोंडचा उड्डाणपूल, मडगाव पार्किंग प्रकल्प पूर्ण करा! वाढत्या वाहतूक समस्येमुळे स्थानिकांची मागणी

Ravanfond Flyover: मडगवातून केपे, सावर्डेकडे जाणाऱ्या बसेस तसेच आर्लेम जंक्‍शनपासून परराज्यात जाणारे ट्रक याच जुन्या पुलावरून जाताहेत. या पुलाच्या खालून रेल्वे ट्रॅकही आहे.

Sameer Panditrao

फातोर्डा: रावणफोंड येथे सहा पदरी उड्डाण पूल, मडगाव येथील बहुमजली वाहन पार्किंग असे आवश्‍‍यक असलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वाढत्या वाहतुकीमुळे या शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची समस्या जटील बनत आहे. तसेच वाहन पार्किंगची व्यवस्था कोडमडलेली आहे.

अनेक वाहनचालक आपले वाहन मिळेल त्या ठिकाणी पार्क करीत आहेत. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मडगांव शहरासाठी रावणफोंड येथील सहा पदरी उड्डाणपुल अत्यंत गरजेचा आहे. ३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला दुपदरी पूल जुना झालेला आहे. तसेच मोडकळीसही आलेला आहे.

मडगवातून केपे, सावर्डेकडे जाणाऱ्या बसेस तसेच आर्लेम जंक्‍शनपासून परराज्यात जाणारे ट्रक याच जुन्या पुलावरून जाताहेत. या पुलाच्या खालून रेल्वे ट्रॅकही आहे.नवा सहा पदरी पूल लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

शॅडो कौन्सिलचे सावियो कुतिन्हो यांनी सांगितले,की हा पूल बांधण्यासाठी २०२१ मध्ये २.३१ कोटींची निविदा काढण्यात आली होती. मात्र, याला कोणी बोलीदार न मिळाल्याने पुन्हा ऑक्टोबर २०२२ मध्ये नव्याने निविदा जाहीर करण्यात आली. या दरम्यान या निविदेची बोली ६१ करोड रुपये दाखविण्यात आली होती. यावेळी निविदेत एवढी तफावत का, त्यामुळे गोंधळही उडालेला होता. सध्या या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

मडगाव येथे बांधण्यात येणारा ‘पे पार्किंग’चा प्रकल्पही रखडला आहे. हा बहुमजली पार्किंग प्रकल्प दिल्ल्ली येथे असलेल्या हायड्रोलिक पद्धतीचा ‘जीआयडीसी’तर्फे बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी अधिकारी दिल्लीला जाणार आहेत.

‘हायड्रोलिक पार्किंग’चा खर्च पेलेल का?

दरम्‍यान, नगरपालिकेत कार्यरत असलेल्या हायड्रोलिक ट्रकचा खर्च परवडत नाही. तर येथे बांधण्यात येणाऱ्या हायड्रोलिक मल्टिपल वाहने प्रोजेक्टसाठी मोठ्या प्रमाणात २४ तास वीज प्रवाह सुरू राहण्याची गरज आहे. तसेच येथे जनरेटरचीही आवश्‍‍यकता आहे. हा प्रकल्प येथे पूर्ण झाल्यास नगरपालिकेला परवडणार का? असा प्रश्नही कुतिन्‍हो यांनी उपस्थित केला आहे. तर हे दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT